पाकिस्तानी (Pakistan) समाजाकडून महिलांना नेहमीच दुय्यमतेची वागणूक देण्यात आली आहे. यातच आता पाकिस्तानमधून महिलांच्या सन्मानाला काळीमा लावणारी घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील एका महिला कर्मचारीने अत्यंत घृणास्पद कृत्य केले आहे. त्यानंतर तिला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्याने एका महिला कैद्याला तिचे कपडे काढायला लावले, त्यानंतर तिला तुरुंगात डान्स करायला भाग पाडले. ही घटना देशातील बलुचिस्तान प्रांतात (Balochistan) घडली आहे. याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने (Pakistan Police News) दिली. पोलीस चौकशी समितीने आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी निरीक्षक शहाना इर्शाद (Shahana Irshad) यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
पोलीस कोठडीत बंद असलेल्या महिला कैद्यासोबत शबानाने अमानवी कृत्य केल्याचे समितीने म्हटले आहे. क्वेटाचे उपमहानिरीक्षक मुहम्मद अझहर अक्रम म्हणाले, 'तपासात असे आढळून आले की, महिला निरीक्षक परी गुल नावाच्या महिलेला चौकशीसाठी (Crimes in Pakistan Jail) पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. हे प्रकरण क्वेट्टामधील जिना बस्ती भागात एका मुलाच्या हत्येशी संबंधित आहे. जेव्हा महिला (परी गुल) पोलिस कोठडीत होती, तेव्हा महिला निरीक्षक शबानाने तिला केवळ नग्न केलेच नाही तर इतर कैद्यांसमोर नाचण्यासही भाग पाडले.
महिला पोलीस कर्मचारी बडतर्फ
न्यायालयाने पीडितेची कारागृहात रवानगी केली आहे. अक्रम म्हणाले, 'लेडी इन्स्पेक्टरला तिच्या बचावात काहीही बोलायचे नव्हते. त्यामुळे तिला सेवानिवृत्त करुन बडतर्फ करण्यात आले आहे. (Pakistan Woman Inspector Dismissed). महिला कैद्याची चौकशी करणे महिला निरीक्षकांना आम्ही बंधनकारक केले आहे, जेणेकरुन तिला तुरुंगातही सुरक्षित ठेवता येईल.
पाकिस्तानात महिला सुरक्षित नाहीत
पाकिस्तानमध्ये महिलांविरोधातील गुन्हे मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, आता तो तुरुंगातही महिला सुरक्षित नाहीत. अलीकडे, महिलांच्या हत्येशी संबंधित अनेक घटना येथून ( Women's security in Pakistan) समोर आल्या आहेत. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली, ज्यामध्ये महिलांनी सरकारकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.