नायजेरियातील क्वारा येथे सोमवारी पहाटे नायजर नदीत एक बोट बुडाली. या अपघातात 100 जणांचा मृत्यू झाला, तर 97 जण बेपत्ता झाले. त्याच वेळी, 100 प्रवाशांना वाचवण्या यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीमध्ये 300 लोक होते. सर्वजण लग्न समारंभातून परतत होते.
पोलिसांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. बेपत्ता लोकांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, जवळच्याच एका गावात काही लोक लग्नासाठी गेले होते. यादरम्यान मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. अशा परिस्थितीत लग्नातील काही पाहुण्यांनी गाव सोडण्यासाठी बोटीने नदी पार करण्याचा ठरवले.
गावकऱ्यांनी सांगितले की, दुसऱ्या बाजूने किनाऱ्याकडे येत असताना त्यांची बोट पाण्यात असलेल्या झाडाच्या खोडावर आदळली आणि तुटली. यानंतर बोटीचे दोन तुकडे झाले आणि पाण्यात बुडाली.
या अपघाताबाबत स्थानिकांनी सांगितले की, बोटीवर पुरुष आणि महिला असे सुमारे 300 लोक होते. सोमवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की बोट पाण्यात झाडाच्या खोडावर आदळली आणि उलटली.
या स्थानिकांच्या माहितीनुसार अपघातातील फक्त 53 लोकांना वाचवता आले. मात्र, प्रशासनाने 97 लोकांना वाचवण्यात आलेचे सांगितले आहे.
या दुर्घटनेला मोठी शोकांतिका असल्याचे म्हणन लुकपाडा म्हणाले की, या अपघातात त्यांनी त्यांचे चार शेजारी गमावले आहेत. सीएनएननुसार, क्वारा पोलिसांचे प्रवक्ते अजय ओकासनमी यांनी सांगितले की, हा अपघात कसा घडला याचा तपास करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे
स्थानिक दैनिक नायजेरियन ट्रिब्यूननुसार, बोटीतून प्रवास करणारे प्रवासी क्वारा येथील कपाडा, एग्बू आणि गकपन गावातील होते.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 60 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. बचावकार्य अजूनही सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की बहुतेक प्रवाशांनी लाइफ जॅकेटसारखे कोणतेही संरक्षणात्मक वस्तूंचा वापर केला नव्हता.
आफ्रिकन देश नायजेरियात बोट अपघात सामान्य आहेत. तेथे स्थानिकांनी बांधलेल्या आणि खराब देखभाल केलेल्या जहाजांचा वापर शेकडो लोकांना नद्यांच्या पलीकडे नेण्यासाठी केला जातो, ज्यामुळे अनेकदा प्रवाशांचा मृत्यू होतो.
2021 मध्ये, त्याच परिसरातील नायजर नदीत एक बोट बुडाली, ज्यात किमान 160 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.