अरे बापरे! कुत्र्याच्या कानाच्या लांबीचे अनोखे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

अधिकाऱ्याने सांगितले की, 3 वर्षीय लूच्या (Lu) कानाची लांबी अधिकृतपणे इतर कुत्र्यांपेक्षा सर्वाधिक आहे, त्यामुळे त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book of World Records) स्थान देण्यात आले आहे.
Oregon
OregonDainik Gomantak
Published on
Updated on

एका कुत्र्याच्या 12.38 इंच लांब कानामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. ओरेगॉन (Oregon) मादी कुत्र्याच्या कानांची लांबी सामान्य कुत्र्यांपेक्षा जास्त आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या (Guinness World Records) एका अधिकाऱ्याने सांगितले की, 3 वर्षीय लूच्या (Lu) कानाची लांबी अधिकृतपणे इतर कुत्र्यांपेक्षा सर्वाधिक आहे, त्यामुळे त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान देण्यात आले आहे.

कुत्र्याच्या मालकाने सांगितले की, आम्हाला माहित होते की लूचे "विलक्षण लांब" कान आहेत, आम्ही तिच्या कानाची लांबी मोजण्याचे ठरवले. ओल्सेन (Olsen) एक पशुवैद्यकीय कार्यकर्त्याने स्पष्ट केले की, ब्लॅक लू चे सुंदर आणि लांब कान आहेत, जे इतरांपेक्षा थोडे लांब आहेत,"

Oregon
पोटात गॅस झाल्याची समस्या घेऊन गेलेली महिला निघाली 8 महिन्यांची गर्भवती

ओल्सेन पुढे म्हणाले की, लूचे विशेषतः लांब कान कोणतीही शारीरिक समस्या निर्माण करत नाहीत. ती पुढे म्हणाली, "नक्कीच, प्रत्येकाला त्याच्या कानांना स्पर्श करायला आवडते, कोणालाही आपल्या शारिरीक अवयवावर प्रेम करण्याची इच्छा निर्माण होणे आवश्यक असते."

ओल्सेन पुढे म्हणते की, लू डॉग शोमध्ये (Dog show) स्पर्धक आहे आणि त्याने अमेरिकन केनेल क्लब आणि रॅली ओबेडियंस मध्ये पदके मिळवली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com