पुन्हा एकदा भारताने केले 54 अ‍ॅप बंद

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाने ज्या अॅप्सवर बंदी घातली आहे त्यात चिन च्या महत्वाच्या कंपण्यांचा समावेश आहे.
Ban on Mobile apps
Ban on Mobile appsDainik Gomantak
Published on
Updated on

भारत सरकारने सुरक्षेच्या दृष्टिने फ्री फायरसह 54 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. जून 2020 पासून भारताने 200 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाने ज्या अॅप्सवर बंदी घातली आहे त्यात चिन (China) च्या महत्वाच्या कंपण्यांचा समावेश आहे. या कंपन्यांन मध्ये अॅसेंट, अलिबाबा आणि नेट आयझ अशी नावे आहेत. (Ban on Mobile apps)

Ban on Mobile apps
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्ध! जगातील या देशांनी बंद केल्या अ‍ॅम्बसी

भारत (India) सरकारने घेतलेल्या निर्णयात बंदी घालण्यात आलेल्यांमध्ये स्वीट सेल्फी एचडी, ब्युटी कॅमेरा- सेल्फी कॅमेरा, इक्वलायझर आणि बास बूस्टर, कॅमकार्ड फॉर सेल्सफोर्स अँट, इसोलॅंड2 : अॅशेस ऑफ टाइम लाइट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेन्सेंट एंडेवर, ऑनमायोझी चेस, ऑनमायोजी अरेना, एपीएल अपोलोक आणि ड्युअल स्पेस लाइट यांचा समावेश आहे.

अनेक कंपन्यांनी भारत सरकारची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला, पण बंदी मात्र कायम राहिली. अ ॅप ऑटोमेशनच्या बाबतीत भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे म्हटले जाते. अॅप रँकिंग प्लॅटफॉर्म अॅप अॅनच्या मते, गेल्या वर्षी भारतात 25 अब्ज डाउनलोड्स झाले होते. पीटीआयच्या (Pti) हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिनी वंशाच्या 54 अॅप्सवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाने औपचारिकरित्या अधिसूचना काढून त्यांच्यावर बंदी घातली. या घेतलाल्या निर्णयात असेही काही अॅप्स आहेत की ज्यांनी गेल्या बंदीनंतर स्वत: ला नवीन स्वरूपात सादर केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com