आता परदेशातही करता येणार UPI पेमेंट; 17 देशांमध्ये सेवा उपलब्ध

यूपीआय परदेशातही खूप लोकप्रिय होत आहे
UPI Payment | UPI Goes Global
UPI Payment | UPI Goes GlobalDainik Gomantak

UPI Goes Global : परदेशात प्रवास करताना UPI पेमेंट कसे करायचे? तिथे भारतात चालणारी UPI पेमेंट पध्दत चालत असेल का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर भारत सरकारने परदेशात असणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ऑनलाईन पेमेंटचे व्यवहार सुलभ करण्यासाठी यूपीआय पेमेंट पध्दत उपलब्ध करून दिली आहे.

त्यामुळे आता परदेशातही भारतीय नागरिक तसेच अनिवासी भारतीय गुगल पे, फोन पे, अॅमेझॉन पे, पेटीएम या युपीआय पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करू शकतात. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

UPI Payment | UPI Goes Global
भारतीय अब्जाधीश उद्योगपतीने लंडनमध्ये खरेदी केला 1200 कोटी रुपयांचा अलिशान बंगला

भारतातील युपीआय पेमेंट सेवा एकूण 17 देशांमध्ये उपलब्ध आहे. इंग्लंड, फ्रान्स, युरोप, ओमान, भूतान, साऊथ कोरिया, युएई, थायलंड, जपान, नेपाळ, मलेशिया, फिलिपाइन्स, कंबोडिया, व्हिएतनाम, हॉंगकॉंग, सिंगापूर, तैवान या देशांमध्ये उपलब्ध आहे. ही युपीआय सेवा हळूहळू सर्व देशांध्ये सुरु केली जात आहे.

गुगल पे, फोन पे, अॅमेझॉन पे, पेटीएम यामधील कोणतेही युपीआय पेमेंट अ‍ॅप फोनमध्ये इंन्स्टॉल करा. त्यानंतर बॅंक अकांऊटला लिंक नंबर युपीआय अ‍ॅप वर टाकून बँक अकाउंट लिंक करा. त्यानंतर तुम्ही व्यवहार करु शकता. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्हाल एक मेसेज येईल. असे तुम्ही परदेशातही UPI अ‍ॅपद्वारे सुरक्षित व्यवहार करु शकता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com