नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफजईने बर्मिंगहॅम मध्ये केला निकाह

मलाला यूसुफजईने लग्नाबाबत घोषणा केल्यानंतर तिला जीवे मारण्याच्या आणि प्राणघातक हल्ला करण्याच्या धमक्या येत होत्या.
Nobel laureate Malala Yousafzai married with  Asser Malik in Birmingham
Nobel laureate Malala Yousafzai married with Asser Malik in BirminghamTwitter/@Malala
Published on
Updated on

नोबेल शांतता पुरस्कार विजेती आणि कार्यकर्ती मलाला युसुफझाईचे यांचे मंगळवारी लग्न झाले. 24 वर्षीय मलालाने तीच्या लग्नाचे फोटो ट्विटरवर शेअर करत ही माहिती दिली. तीने असर मलिकसोबत एका छोट्याशा समारंभात कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केले. असर मलिक हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हाय परफॉर्मन्स सेंटरचे महाव्यवस्थापक आहेत. दोघांचे लग्न युनायटेड किंगडममधील बर्मिंगहॅम येथे झाले होते.

Nobel laureate Malala Yousafzai married with  Asser Malik in Birmingham
Nobel laureate Malala Yousafzai married with Asser Malik in BirminghamTwitter/@Malala

“आज माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. असर आणि मी लाइफ पार्टनर च्या पवित्र बंधनात अडकलोय. बर्मिंगहॅममध्ये आम्ही आमच्या कुटुंबियांसोबत एक छोटा निकाह सोहळा आयोजित केला होता. आम्हाला तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद द्या. आम्ही दोघेही आमच्या आयुष्याचा पुढचा प्रवासात एकत्रीत घालवण्यास उत्सुक आहोत,” असे लग्नाचे फोटो शेअर करत मलालाने म्हटले आहे.

Nobel laureate Malala Yousafzai married with  Asser Malik in Birmingham
Nobel laureate Malala Yousafzai married with Asser Malik in BirminghamTwitter/@Malala

पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या मलाला युसुफझाईला दडपण्यासाठी 2012 मध्ये तालिबान्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या डोक्यात गोळ्या घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. शाळेतून घरी परतणाऱ्या मलालावर झालेला हा हल्ला जीवघेणा होता. ब्रिटनमध्ये प्रदीर्घ उपचारानंतर ती बरी झाली आणि पुन्हा एकदा तीने तिची मोहीम सुरू केली. मलाला ही नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती आहे.

Nobel laureate Malala Yousafzai married with  Asser Malik in Birmingham
Nobel laureate Malala Yousafzai married with Asser Malik in BirminghamTwitter/@Malala

लग्नाबाबत दिली होती धमकी

या वर्षी जूनमध्ये मलाला युसूफझाईने लग्नाबाबत घोषणा केली होती, त्यानंतर तिला आत्मघातकी हल्ल्यात जीवे मारण्याच्या आणि प्राणघातक हल्ला करण्याच्या धमक्या येत होत्या. वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत युसुफझाई म्हणाली की, ती कधी लग्न करेल की नाही याची खात्री तीला नव्हती. ''मला अजूनही समजले नाही की लोकांना लग्न का करावे लागते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती हवी असेल तर तुम्हाला लग्नाच्या कागदपत्रांवर सही करण्याची गरज का आहे, ती फक्त भागीदारी का असू शकत नाही?" असे वक्तव्य मलालाने त्या मुलाखतीत केले होते. मलाला वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात खोऱ्यातील महिला आणि मुलांच्या शिक्षण आणि मानवी हक्कांसाठी लढा देणारी महिला म्हणून ओळखली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com