सरकारी कर्मचाऱ्यांना पगार नाही; श्रीलंका छापतेय नवीन नोटा

नवीन चलन छापण्यात येणार असून ते विमान कंपन्यांनाही विकण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
Sri Lanka
Sri LankaDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंकेतील हिंसक निदर्शनांनंतर आता नवीन सरकार सत्तेवर आले आहे. पण आर्थिक परिस्थिती अजूनही चांगली झालेली नाही. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न चालूच आहे. त्यासाठी सरकारने काही योजनांवर कामही सुरू केले. त्यासाठी नवीन चलन छापण्यात येणार असून ते विमान कंपन्यांनाही विकण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. (No pay for government employees Sri Lanka prints new notes)

Sri Lanka
इराकमध्ये उसळले वाळूचे वादळ; 4000 हून अधिक लोक रुग्णालयात दाखल

कर्मचाऱ्यांकडे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत

श्रीलंकेत (Sri Lanka) सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारकडे पुरेसे पैसे नाहीत, त्यामुळेच नव्या नोटा छापण्याचा निर्णय सरकरकडून घेण्यात आला आहे. सरकारने राष्ट्रीय विमानसेवाही विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी यापूर्वी देशाला संबोधित करताना सांगितले होते की, नवीन सरकार श्रीलंकन ​​एअरलाइन्सचे खाजगीकरण करण्याची योजना आखते आहे.

एअरलाइन्सचे झाले मोठे नुकसान

आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे की, 'इकॉनॉमी नेक्स्ट' वेबसाइटच्या अहवालानुसार, माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांना व्यवस्थापकीय पदावरून हटवल्यानंतर एअरलाइनचे शेअरहोल्डर श्रीलंकन ​​एअरलाइन्सला मोठा तोटा झाल्याचे सांगण्यात आले आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी काही उपायांची घोषणा करताना, विक्रमसिंघे म्हणाले की, "एकट्या 2020-21 मध्ये तिची तूट 45 अब्ज रुपये एवढी होती. मार्च 2021 पर्यंत त्याचे एकूण नुकसान 372 अब्ज रुपये एवढे होते.

Sri Lanka
China Black Box Data: चिनी विमान कोसळण्याच्या कटामागे कोणाचा हात?

पंतप्रधानांनी निधी उभारण्याबाबत दिली माहिती

विक्रमसिंघे यांनी राष्ट्राला संबोधित करताना सांगितले की, श्रीलंकेच्या सागरी सीमेवर असलेल्या पेट्रोल, कच्च्या तेल, फर्नेस ऑइलच्या मालाची भरपाई करण्यासाठी खुल्या बाजारातून अमेरिकन डॉलर्स उभे केले जाणार आहेत. तो म्हणाला की, "मी एक धोकादायक आव्हान स्वीकारत आहे, मी धारदार चपला घातल्या आहेत, जे मला काढता येत नाहीत. मी माझ्या देशाच्या फायद्यासाठी हे आव्हान स्वीकारतो आहे." माझे ध्येय आणि समर्पण कोणत्याही व्यक्ती, कुटुंब किंवा पक्षाला वाचवणे नाहीये. या देशातील सर्व लोकांचे आणि माझ्या भावी पिढ्यांचे भविष्य वाचवणे हेच माझे ध्येय आहे.

सध्याच्या आर्थिक संकटात पुढील दोन महिने सर्वात कठीण असतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. राष्ट्राला संबोधित करताना ते म्हणाले की, “पुढील एक किंवा दोन महिने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण असणार आहेत. या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण थोडा त्याग केला पाहिजे आणि स्वत:ला तयार करायला हवे. त्यासाठी येत्या दोन-चार दिवसांत 75 दशलक्ष डॉलर्स आपल्याला गाठावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com