न्यूयॉर्कमध्ये 'इडा' चे थैमान, 41 जणांचा दुर्दैवी मृत्यू

अमेरिकेमध्ये (America) इडा चक्रीवादळाने (Ida storm) हाहा:कार माजवला आहे.
New York Floods: 41 died in city dew to Ida storm
New York Floods: 41 died in city dew to Ida stormDainik Gomantak

अमेरिकेमध्ये (America) इडा चक्रीवादळाने (Ida storm) हाहा:कार माजवला आहे. गेल्या एंक दिवसांपासून सुरू असेल्या या चक्रीवादळाचा (Hurricane) सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला (New York Flood) बसला आहे. येथील जनजिवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. सुसाट्याच्या वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसामुळे न्यूयॉर्कमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. AFP या न्यूजसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इडा चक्रीवादळामुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे.(New York Floods: 41 died in city dew to Ida storm)

बुधवारी उशिरापर्यंत न्यूयॉर्कचे एफडीआर ड्राइव्ह आणि ब्रॉन्क्स नदीचा पार्कवे पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. सबवे स्टेशन आणि ट्रॅकवर इतका पूर आला की महानगर परिवहन प्राधिकरणाने सर्व सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. हे संकट पाहता न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी बुधवारी शहरात आणीबाणी घोषित केली आहे. मुसळधार पावसामुळे शहरात भीषण पूर आला असून या पुराच्या पाण्यात अनेक वाहने बुडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्याचबरोबर शहरातील अनेक घरे देखील पाण्याखाली गेली आहेत.

New York Floods: 41 died in city dew to Ida storm
Video: चक्रीवादळामुळे चीनमध्ये प्रचंड विध्वंस; 50 हून अधिक घरांचे नुकसान

न्यूयॉर्कमधील वादळामुळे शहराची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या मुसळधार पुरामुळे शहरातील बहुतांश भुयारी सेवा बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर न्यू जर्सीतील नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत . न्यू जर्सी ट्रान्झिटने सर्व रेल्वे सेवा बंद केल्या. न्यूयॉर्क शहराचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे आणि रस्त्यावर जाऊ नका अशी विनंती देखील केली आहे.

दरम्यान या आगोदरच अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने या मोठ्या वादळाबद्दल चिंता व्यक्त केली होती. हे वादळ अधिक मजबूत होत असल्याचे देखील राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने स्पष्ट केले होते होते. आणि हा इशारा मिळताच अनेक लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून हलवून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com