
COVID Latest Update: जगात कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. चीनमधून पसरलेल्या या व्हायरसने आता पुन्हा डोके वर काढले. गेल्या काही दिवसांत सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने लोक धास्तावले आहेत. याचदरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनासारखाच आणखी एक नवा व्हायरस मानवजातीसाठी धोकादायक ठरणार असल्याचा इशारा अमेरिकन शास्त्रज्ञांनी दिला आहे. संशोधकांच्या मते, नवीन HKU5-CoV-2 विषाणू मानवांमध्ये संसर्ग आणि उद्रेक घडवून आणण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे.
दरम्यान, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासातून हा धक्कादायक खुलासा झाला आहे. एवढचं नाहीतर ही धोक्याची घंटा असल्याचे देखील त्यांनी म्हटले. MERS हा धोकादायक विषाणूचा श्वसनाच्या सिंड्रोमशी जवळचा संबंध आहे. एवढचं नाहीतर अरब द्वीपकल्पात राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्यांना लोकांना हा व्हायरस प्रभावित करु शकतो, अशी शक्यता देखील अभ्यासातून वर्तवण्यात आली. या व्हायरसची लक्षणे कोरोनासारखीच असली तरी MERS हा एक अत्यंत प्राणघातक विषाणू आहे, जो संक्रमित झालेल्यांपैकी एक तृतीयांश लोकांसाठी जीवघेणा ठरतो.
अभ्यासानुसार, HKU5 विषाणूचा फारसा अभ्यास झालेला नव्हता, परंतु आमच्या अभ्यासातून असे दिसून आले की, हा व्हायरस मानवी पेशींना कसा संक्रमित करतो. आम्हाला असेही आढळून आले की HKU5 विषाणू मानवांमध्ये पसरण्यापासून फक्त एक पाऊल दूर असू शकतो, असे प्रोफेसर मायकल लेटको म्हणाले. अभ्यासाच्या निष्कर्षांवरुन असे दिसून आले की, विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये थोडासा बदल केल्याने तो मानवी ACE2 पेशींशी निगडित मानला जाऊ शकतो.
अभ्यासात असेही नोंदवले गेले की, जोपर्यंत विषाणूमध्ये विशिष्ट उत्परिवर्तन होत नाहीत ज्यामुळे त्याची ACE2 ला चिकटून राहण्याची क्षमता सुधारते तोपर्यंत मानवी पेशी फार कमी प्रतिसाद देतात. जर HKU5 या विषाणूनने मिंक किंवा सिव्हेट सारख्या प्राण्याांना संक्रमित केले तर तो मानवांपर्यंत पोहोचण्यासाठी गती धारण करु शकतो.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला चीनमधील वुहानमधील शास्त्रज्ञांनी अहवाल दिला की, HKU5 चा एक प्रकार लाइनेज 2 मानवी पेशींना अधिक विकसित न होता संक्रमित करु शकतो. आता, अमेरिकेतील संशोधकांनी संपूर्ण मर्बेकोव्हायरस फॅमिलीचा अभ्यास करुन मानवी पेशींना संक्रमित करण्याची त्याची क्षमता चांगल्या प्रकारे समजून घेतली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, लाइनेज 2 अधिक धोकादायक दिसतो, मानवी पेशींमध्ये तो सहज प्रवेश करु शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.