OMG! पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर खुलेआम करतायेत 'सेक्स', प्रशासनाकडून अलर्ट जारी

Netherlands: समुद्र किनारी वसलेल्या शहरांना अनेकवेळा पर्यटकांच्या हरकतीमुळे कठोर निर्णय घ्यावे लागतात.
Beach
BeachDainik Gomantak

Netherlands: समुद्र किनारी वसलेल्या शहरांना अनेकवेळा पर्यटकांच्या हरकतीमुळे कठोर निर्णय घ्यावे लागतात. यातच, आता नेदरलॅंडमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नेदरलॅडच्या वीरे शहराशी संबंधित हे प्रकरण आहे.

पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर लैंगिक कृत्ये करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे स्थानिक लोक समुद्रकिनाऱ्यावर फिरणे टाळू लागले आहेत. जिथे आता स्थानिक प्रशासनाकडून ठिकठिकाणी पोस्टर लावून असे प्रकार करु नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

द गार्डियनच्या वृत्तानुसार, स्थानिक प्रशासन आणि वॉटर बोर्डाकडे पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर लैंगिक कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

वाळूचे ढिगारे स्थानिक समुदायासाठी खूप महत्त्वाचे आहेत, असे वीरेचे महापौर फ्रेडरिक स्कोव्हनर यांनी सांगितले. येथे पर्यटक लैंगिक कृत्ये करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासोबतच सुट्टी घालवण्यासाठी आलेल्या इतर पर्यटकांचेही (Tourists) हाल होत आहे.

Beach
LGBTQ Rights : भारतीय-अमेरिकन समलैंगिक समुदायाचे PM Modi यांना साकडे; भारतातील वादग्रस्त विषयावर मागितला पाठींबा

महापौरांचे पर्यटकांना आवाहन

समुद्रकिनाऱ्यावर सेक्स करण्यास बंदी असल्याचे सांगत प्रशासनाने आठ नवीन पोस्टर ठिकठिकाणी लावले असल्याचे यावेळी महापौरांनी सांगितले. अशा घटना टाळण्यासाठी आम्ही दक्षता वाढवली आहे. यासोबतच असे काही करणाऱ्या पर्यटकांची तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही फ्रेडरिक यांनी केले आहे.

Beach
Baba Vanga Predictions: सर्वनाश होणार? बाबा वेंगा यांच्या 2023 च्या भाकिताने...!

उपाहारगृह मालकांच्या अडचणी वाढल्या

दुसरीकडे, प्रशासनाच्या या निर्णयामुळे समुद्रकिनाऱ्यावरील रेस्टॉरंट (Restaurant) मालक चिंतेत आहेत. कारण, नवीन नियमानुसार आता त्यांना बीचवर सेक्स ऑन कॉकटेल ऑर्डर करणार्‍यांचा आयडीही मागवावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी त्यांना भीती आहे.

मार्को विचेर्ट नावाच्या एका रेस्टॉरंटच्या मालकाने सांगितले की, तो येथे 14 वर्षांपासून व्यवसाय करत आहे, परंतु त्याला सेक्स एक्सची कधीही समस्या आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com