Netflix Subscription Cost: 'नेटफ्लिक्स'ने सब्स्क्रिप्शनचे दर का वाढवले? नवीन दर काय, कधी आणि कोणत्या देशांमध्ये लागू होणार वाचा

Netflix Plans Updated Pricing: नेटफ्लिक्सने युनायटेड स्टेट्स, कॅनडा, पोर्तुगाल आणि अर्जेंटिनासह अनेक देशांमध्ये त्यांच्या सर्व सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ जाहीर केली आहे.
Netflix Subscription Cost: 'नेटफ्लिक्स'ने सब्स्क्रिप्शनचे दर का वाढवले? नवीन दर काय, कधी आणि कोणत्या देशांमध्ये लागू होणार वाचा
Netflix OfflineDainik Gomantak
Published on
Updated on

Netflix Subscription Cost Increase

नेटफ्लिक्सने युनायटेड स्टेट्स, कॅनडा, पोर्तुगाल आणि अर्जेंटिनासह अनेक देशांमध्ये त्यांच्या सर्व सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ जाहीर केली आहे. कंपनीच्या 2024 च्या चौथ्या तिमाहीच्या उत्पन्न अहवालातून नवीन किंमत जाहीर करण्यात आली.

नेटफ्लिक्सच्या (Netflix) मते, वाढलेली किंमत कंपनीच्या प्रोग्रामिंग आणि प्लॅटफॉर्म सुधारणांमध्ये गुंतवणूक करत असताना जास्तीत जास्त महसूल मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. नवीन ग्राहकांसाठी नवीन किमती तात्काळ लागू होतील, तर विद्यमान ग्राहकांसाठी त्या त्यांच्या पुढील बिलिंग सायकलपासून लागू होतील.

Netflix Subscription Cost: 'नेटफ्लिक्स'ने सब्स्क्रिप्शनचे दर का वाढवले? नवीन दर काय, कधी आणि कोणत्या देशांमध्ये लागू होणार वाचा
Netflix यूजर्संना आता आणखी एका खास फिचर्सला म्हणावं लागणार अलविदा; मिळणार नाही ‘ही’ सुविधा

नेटफ्लिक्स प्लॅन

दरम्यान, अमेरिकेत (America) नेटफ्लिक्सने जाहिरातींसह स्टँडर्ड प्लॅन $6.99 वरुन $7.99 प्रति महिना केला आहे. जाहिरातमुक्त 1080P एचडी व्हिडिओ देणाऱ्या स्टँडर्ड प्लॅनची ​​किंमतही $15.49 वरुन $17.99 प्रति महिना झाली आहे. दरम्यान, 4के स्ट्रीमिंगला सपोर्ट करणारा एकमेव पर्याय असलेल्या प्रीमियम प्लॅनची ​​किंमत $22.99 वरुन $24.99 करण्यात आली आहे. कॅनडासह इतर देशांमधील नेटफ्लिक्स वापरकर्त्यांसाठीही अशाच प्रकारच्या किंमतीत बदल अपेक्षित आहेत.

नेटफ्लिक्सने किमती का वाढवल्या?

नेटफ्लिक्सने किंमत वाढीमागे गुंतवणूक करण्याची आणि चांगला कंटेंट प्रदान करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. "आम्ही आमच्या प्रोग्रामिंगमध्ये सातत्याने गुंतवणूक करतो. तसेच, ग्राहकांना अधिक वॅल्यू देत राहतो," असे कंपनीने गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. पत्रात पुढे असेही म्हटले की, यासाठी, कधीकधी आपल्याला त्यांच्याकडून थोडी जास्त किंमत अपेक्षित असते जेणेकरुन आपण नेटफ्लिक्सला आणखी चांगले बनवू शकू.

Netflix Subscription Cost: 'नेटफ्लिक्स'ने सब्स्क्रिप्शनचे दर का वाढवले? नवीन दर काय, कधी आणि कोणत्या देशांमध्ये लागू होणार वाचा
Netflix, Hotstarसह डिजिटल मीडियाची मक्तेदारी संपणार, सरकार आणणार नवा कायदा

ग्राहक संख्येत विक्रमी वाढ

दरम्यान, 2024 च्या चौथ्या तिमाहीत नेटफ्लिक्सने 18.9 दशलक्ष नवीन ग्राहकांची भर घालण्याची घोषणा केली असताना किंमत वाढवण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या इतिहासातील कोणत्याही तिमाहीतील ही सर्वात मोठी वाढ आहे. नेटफ्लिक्सचा जागतिक सब्सक्राइबर बेस 300 दशलक्षांवर पोहोचला आहे. नेटफ्लिक्सचे सह-सीईओ ग्रेग पीटर्स यांनी सांगितले की, किंमत वाढ अर्थपूर्ण आहे, विशेषतः जाहिरात-समर्थित योजनांसाठी. किंमत वाढल्यानंतरही ही सुरुवातीची किंमत एंटरटेनमेंट वॅल्यू प्रदान करते असे आम्हाला वाटते. हा लोकांसाठी एक अतिशय सुलभ एन्ट्री पॉंइट आहे.”

आर्थिक कामगिरी आणि भविष्यातील अपेक्षा

नेटफ्लिक्सने 2025 साठीचा रेव्हेन्यू फोरकास्ट 43.5 अब्ज डॉलर्सवरुन 44.5 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवला आहे, जो पूर्वीपेक्षा 500 दशलक्ष डॉलर्सने जास्त आहे. कंपनी 29% च्या ऑपरेटिंग मार्जिनचा अंदाज लावते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com