नेपाळमध्ये पहिल्यांदाच Lesbian जोडप्याचे लग्न, अधिकृत नोंदणी करत रचला इतिहास

Same Sex Marriage: गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी माया गुरुंग (35) आणि सुरेंद्र पांडे (37) यांनी लमजुंग जिल्ह्यातील पहिले 'गे' जोडपे म्हणून अधिकृतपणे त्यांच्या लग्नाची नोंदणी केली होती.
Nepal's First Lesbian Couple Gets Married
Nepal's First Lesbian Couple Gets Married

Nepal's First Lesbian Couple Gets Married, History created by official registration:

भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये लेस्बियन जोडप्याच्या अधिकृत विवाहाची पहिलीच घटना समोर आली आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची अधिकृत नोंदणीही केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजू देवी श्रेष्ठ उर्फ ​​दीप्ती आणि सुप्रीता गुरुंग यांनी नेपाळमध्ये अधिकृतपणे लग्नाची नोंदणी करणारे पहिले 'लेस्बियन' जोडपे ठरत इतिहास रचला आहे.

लेस्बियन पद्धतीने लग्न करणाऱ्या दोघींचे वय 33 वर्षे आहे. पश्चिम नेपाळमधील बर्दिया जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या दीप्ती आणि स्यांगजा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सुप्रीता यांनी नुकतेच बर्दिया जिल्ह्यातील जमुना ग्रामीण नगरपालिकेत लग्नाची नोंदणी केली.

समलैंगिक कार्यकर्ते आणि माजी खासदार सुनील बाबू पंत यांनी सांगितले की, प्रभाग सचिव दीपक नेपाळ यांनी त्यांना विवाह प्रमाणपत्र दिले.

Nepal's First Lesbian Couple Gets Married
Joe Biden नी हे काय केले? TikTok वर अकाउंट चालू केल्याने सुरक्षा अधिकारी चिंतेत

पंत यांनी दावा केला की, दक्षिण आशियामध्ये समलिंगी जोडप्याने त्यांच्या विवाहाची अधिकृत नोंदणी केल्याची ही पहिलीच घटना आहे. समलिंगी विवाहाची औपचारिक नोंदणी करणारा नेपाळ हा दक्षिण आशियातील पहिला देश आहे.

गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी माया गुरुंग (35) आणि सुरेंद्र पांडे (37) यांनी लमजुंग जिल्ह्यातील पहिले 'गे' जोडपे म्हणून अधिकृतपणे त्यांच्या लग्नाची नोंदणी केली. गुरुंग आणि पांडे दोघेही त्यांच्या जन्माच्या वेळी पुरुष होते.

Nepal's First Lesbian Couple Gets Married
Viral Video: परदेशी नागरिकांनी विमानात गायले भारताचे राष्ट्रगीत, पाहा करोडो लोकांची मनं जिंकणारा व्हिडिओ

2007 मध्ये, नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहास मान्यता दिली, ज्याचा 2015 मध्ये घटनेत समावेश करण्यात आला.

तथापि, गेल्या वर्षी 27 जून रोजी, सर्वोच्च न्यायालयाने नेपाळमध्ये समलैंगिक विवाह अधिकृतपणे कायदेशीर करण्यासाठी गुरुंगसह विविध व्यक्तींच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या रिट याचिकेवर आधारित अंतरिम आदेश जारी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com