PM Prachanda: नेपाळच्या पंतप्रधानांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश; 5000 नागरिकांच्या हत्येची...

PM Prachanda: त्यांच्याविरुद्ध दोन याचिका दाखल केल्या गेल्या आहेत.
Pushpa Kamal Dahal Prachanda
Pushpa Kamal Dahal PrachandaDainik Gomantak
Published on
Updated on

PM Prachanda: नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दाहाल प्रचंड यांच्याविरुद्ध नरसंहार केल्याप्रकरणी रिट दाखल केले गेले आहेत. आता या प्रकरणात नेपाळच्या सुप्रिम कोर्टाने 9 मार्चला पंतप्रधान पुष्पकमल दाहाल प्रचंड यांनी कोर्टात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी केले आहे.

काठमांडूमध्ये जानेवारीमध्ये 2020 मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान पुष्पकमल दाहाल प्रचंड सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी 5000 नागरिकांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती.

पुष्पकमल दाहाल प्रचंड यांच्या या वक्तव्यानंतर दोन वेगवेगळे रिट सुप्रिम कोर्टात दाखल केले होते. आता या दोन्ही रिटची सुनावणी एकाचवेळी करणार असल्याचे म्हटले गेले आहे.

नेपाळच्या सुप्रिम कोर्टाचे वकील कल्याण बुढाथोकी, सुवास गिरी यांच्यासोबत 8 वकिलांनी आणि सुप्रिम कोर्टाचे वकील ज्ञानेंद्र राज अरन सोबत 14 लोकांनी पुष्पकमल दाहाल प्रचंड यांच्याविरोधात दोन याचिका सुप्रिम कोर्टात दाखल केल्या आहेत.

याचिकाकर्ता कल्याण बुढाथोकी यांनी म्हटले आहे की प्रचंड यांनी स्वत:च 5000 नागरिकांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध नरसंहाराच्या याचिका दाखल केल्या गेल्या आहेत.

Pushpa Kamal Dahal Prachanda
Dhaka Blast: ढाकामध्ये भीषण विस्फोट, 16 जणांचा मृत्यू; 100 हून अधिक जखमी

दरम्यान, जनयुद्धाच्या नावावर पुष्पकमल दाहाल प्रचंड यांच्या आदेशानुसार सामुहिक नरबळी किंवा नागरिकांच्या हत्या केल्या गेल्याची माहिती मिळाली आहे.

आता सुप्रिम कोर्ट ( Supreme Court ) देशाच्या पंतप्रधान असलेल्या पुष्पकमल दाहाल प्रचंड यांच्या प्रकरणात काय निर्णय घेणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com