Nepal PM Resigned: केपी शर्मा ओली यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, Gen-Z च्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये सत्तांतर

Nepal PM KP Sharma Oli Resigned: नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Nepal PM KP Sharma Oli Resigned
Nepal PM KP Sharma Oli ResignedDainik Gomantak
Published on
Updated on

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला आहे. मंगळवारी राजधानी काठमांडूसह देशातील प्रमुख शहरांमध्ये केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हिंसक निदर्शने झाली.

तत्पूर्वी, ओली यांनी देशात सुरू असलेल्या हिंसाचारावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. त्यांनी एक निवेदन जारी करून कालपासून राजधानी काठमांडू आणि देशाच्या विविध भागात सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल दुःख व्यक्त केले.

Nepal PM KP Sharma Oli Resigned
Goa Third District: तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती! गोवा सरकारला घ्यावा लागणार 4 महिन्यात निर्णय; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढले दडपण

ओली म्हणाले की, काल राजधानी काठमांडू आणि देशाच्या विविध भागात झालेल्या निदर्शनांमुळे आणि त्यानंतर घडलेल्या घटनांमुळे मला खूप दुःख झालं आहे. कोणत्याही प्रकारची हिंसाचार राष्ट्राच्या हिताचा नाही असे धोरण आम्ही स्वीकारले आहे आणि आम्ही शांततापूर्ण आणि संवादावर आधारित तोडगा शोधत आहोत.

Nepal PM KP Sharma Oli Resigned
Goa Leopards: कुत्री भुंकली म्हणून बाहेर गेले, तर समोर 'बिबट्या'; डिचोली परिसरात वाढती दहशत

परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि अर्थपूर्ण तोडगा काढण्यासाठी मी संबंधित पक्षांशी बोलत आहे. यासाठी मी आज संध्याकाळी ६ वाजता सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे. मी देशातील सर्व बंधूभगिनींना या कठीण काळात शांत राहण्याची नम्र विनंती करतो.

नेपाळ सध्या अत्यंत अस्थिरतेच्या काळातून जात आहे. देशभरात सरकारविरुद्ध निदर्शने केली जात आहेत. अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. अनेक मंत्री, नेते आणि माजी पंतप्रधानांची घरे आणि कार्यालये जाळण्यात आली आहेत. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या २१ खासदारांनी आपले राजीनामे सादर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com