Nawaz Sharif: चार वर्षानंतर नवाज शरीफ पाकिस्तानात परतणार

Nawaz Sharif: एका अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने नवाज यांच्या अटकेला २४ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
Nawaz Sharif
Nawaz Sharif Dainik Gomantak

Nawaz Sharif: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीएमएल (एन) पक्षाचे संस्थापक नवाझ शरीफ पाकिस्तानात परतत आहेत. शरीफ 2019 पासून लंडनमध्ये होते. गुरुवारी स्थानिक न्यायालयाने नवाझ शरीफ यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.

त्यानंतर त्यांनी पाकिस्तानात परतण्याचा निर्णय घेतला आहे. नवाझ शरीफ शनिवारी लाहोरला पोहोचू शकतात. नवाझ शरीफ यांना 2018 मध्ये कोर्टाने निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित करून तुरुंगात पाठवले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना लंडनला उपचारासाठी जाण्याची परवानगी कोर्टाकडून देण्यात आली. त्यानंतर नवाझ शरीफ पाकिस्तानच्या बाहेर आहेत.

नवाझ शरीफ यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यांमुळे त्यांना पाकिस्तानात परत येताच तुरुंगात जाण्याचा धोका होता. त्यामुळे ते आपल्या देशात परतत नव्हते. गुरुवारी एका अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने नवाजच्या अटकेला २४ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.

त्यानंतर त्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला. नवाझ शरीफ यांच्या पक्ष पीएमएलएनचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी येण्याची शक्यता आहे. नवाझ शरीफ यांचे बंधू आणि माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कार्यकर्त्यांना नवाझ शरीफ यांचे जंगी स्वागत करण्याचे आवाहन केले आहे.

Nawaz Sharif
“हिटलर योग्य होता कारण..”, महिला कर्मचाऱ्याची नोकरीवरुन हकालपट्टी; वाचा नेमकं प्रकरण

1997 मध्ये नवाझ शरीफ दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची यशस्वी चाचणी आणि भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांच्या कार्यकाळात चर्चा झाली.

मात्र, भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याच्या बाजूने दिसणाऱ्या नवाझ यांच्या कार्यकाळात कारगिल युद्धदेखील घडले, त्यात पाकिस्तानच्या पराभवाने नवाझ शरीफ यांच्या अडचणी वाढल्या. परवेझ मुशर्रफ यांनी त्यांना पदच्युत करून सत्ता काबीज केली.

2013 मध्ये शरीफ तिसर्‍यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. पनामा पेपर्स लीक प्रकरण एप्रिल 2016 मध्ये समोर आले होते. यामध्ये शरीफ कुटुंबावर अनेक आरोप करण्यात आले होते. यानंतर नवाझ शरीफ यांच्या अडचणीत वाढ झाली आणि पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधानपदच गमवावे लागले नाही तर त्यांना ४ वर्षे लंडनमध्ये काढावी लागली. आता पुन्हा पाकिस्तानात शरीफ यांचे स्वागत कसे होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com