अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा केल्यानंतर देशात सर्वत्र अराजकतेचे वातावरण पसरले असताना दुसरीकडे मात्र नवरात्रोत्सवानिमित्त अफगाणिस्तानमध्ये 'हरे रामा हरे कृष्णाची' धून ऐकू लागली आहे. हो खरच तुमचा विश्वास बसला नसेल ना! पण हे खरं आहे. सध्या नवरात्रीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे हिंदू बांधव आपली निस्सीम भक्ती मातेच्या चरणी अर्पण करत आहेत. यातच अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमध्ये (Kabul) नवरात्रोत्सव साजरा (Navratri 2021) केला जात आहे. तेथे जागरण आणि कीर्तनामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. आता तुम्ही असा विचार करत असाल की जर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला असेल तर तिथे हिंदू आणि शीख (Hindu and Sikh Community in Afghanistan) कसे नवरात्र साजरे करत आहेत. याचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून मिळेल. तालिबान्यांच्या सावटाखाली राहणारे हिंदू आणि शीख समाजातील लोक नवरात्रीच्या दिवशी काबूलमधील अस्माई मंदिरात कीर्तन आणि जागरण करत आहेत. त्यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.
अहवालांनुसार, काबूलमधील अस्माई मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम शरण सिंह यांनी सांगितले की, आम्ही कीर्तन आणि जागरणासह भंडारा आयोजित केला. यामध्ये गरजूंना अन्न देण्यात येते. या कार्यक्रमात सुमारे 150 लोक जमले होते, ज्यात अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंसह शीख बांधवांचाही समावेश होता.
या हिंदू-शीखांनी भारत सरकारलाही त्यांना अफगाणिस्तानातून लवकरात लवकर आम्हाला सुरक्षित येथून काढण्याचे देखील यावेळी आवाहन केले आहे. या बांधवांचे म्हणणे आहे की, सध्या अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.