NASA UFO Report: खरचं एलियन्स आहेत का? NASA ने प्रसिद्ध केलेला 33 पानांचा UFO रिपोर्ट काय आहे?

UFO चा अभ्यास करण्यासाठी नवीन वैज्ञानिक तंत्रांची आवश्यकता आहे.
NASA UFO Report Aliens
NASA UFO Report Aliens Dainik Gomantak

NASA UFO Report: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने गुरुवारी यूएफओ आणि एलियन्सशी संबंधित एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात यूएफओबाबत सुमारे वर्षभर चाललेल्या अभ्यासाचे निष्कर्ष नमूद करण्यात आले आहेत.

UFO चा अभ्यास करण्यासाठी नवीन वैज्ञानिक तंत्रांची आवश्यकता आहे. उच्च-तंत्रज्ञान उपग्रहांचा समावेश असलेल्या तसेच अज्ञात उडणाऱ्या वस्तू शोधण्याच्या पद्धतीत बदल करू शकतील अशा नवीन वैज्ञानिक तंत्रांची आवश्यकता आहे. असे या अहवालात म्हटले आहे.

नासाच्या 33 पानांच्या या अहवालात विविध खुलासे केले आहेत. एलियन्स किंवा यूएफओचा वैज्ञानिक शोध घेणार असल्याचे आश्वासन नासाने दिले आहे. तांत्रिक तज्ञांची मदत घेणार. एलियन किंवा उडती तबकडी दिसणे UFO हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे.

अमेरिकेने यूएफओला वेगवेगळ्या नावांनी संबोधण्यास सुरुवात केली आहे. याला UAP - Unidentified Anomalous Phenomena म्हणतात.

उच्च दर्जाची चित्रे किंवा व्हिडिओ नसल्यामुळे, UFO समजण्यास अधिक कठीण होते. अशा नैसर्गिक घटना अनेक वेळा स्पष्ट होत नाहीत. यानंतर नासाने 16 जणांची टीम तयार केली. या टीममध्ये वैज्ञानिक, वैमानिक आणि डेटा विश्लेषण तज्ञांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खगोलभौतिकशास्त्रज्ञ डेव्हिड स्पर्झेल यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली होती. या टीमने अशा घटनांशी संबंधित डेटाचा सतत 9 महिने तपास केला. टीम UFOs आणि UAP च्या सापडलेल्या व्हिडिओ आणि छायाचित्रांचा अभ्यास करत होते.

दरम्यान, आजपर्यंत अवकाशातून एलियन आणि यूएफओ आल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. असे पेंटागॉनने सांगितले होते. यावरुन एलियन कधीच पृथ्वीवर आले नाहीत असे दिसून येते.

एलियनच्या उडत्या तबकड्या दिसल्याचा घटनांचा तपास पेंटागॉन करत आहे. विविध ठिकाणी नजरेस पडलेल्या विविध घटना आणि त्याची माहिती, अशा शेकडो अहवालांची चौकशी अजूनही सुरू आहे. परंतु पेंटागॉनला आतापर्यंत एलियन्स आणि त्यांच्या स्पेसशिप्स म्हणजेच यूएफओचे पृथ्वीवर लँडिंग किंवा टेकऑफ झाल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com