Myanmar: आँग सान स्यू की यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा

म्यानमारच्या (Myanmar) पदच्युत नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आँग सान स्यू की यांना भ्रष्टाचाराच्या पहिल्या प्रकरणात बुधवारी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
Myanmar's Nobel laureate Aung San Suu Kyi
Myanmar's Nobel laureate Aung San Suu KyiDainik Gomantak

म्यानमारच्या पदच्युत नेत्या आणि नोबेल पारितोषिक विजेत्या आँग सान स्यू की यांना भ्रष्टाचाराच्या पहिल्या प्रकरणात बुधवारी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना (Aung San Suu Kyi) लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. म्यानमारच्या (Myanmar) लष्करी न्यायालयाने 76 वर्षीय सू की यांना 600,000 डॉलरची रोकड आणि सोने लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवले. सू की यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे (Corruption) एकूण 11 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी हा एक आहे. प्रत्येक प्रकरणात कमाल तुरुंगवासाची शिक्षा 15 वर्षांपर्यंत आहे. (Myanmar's Nobel laureate Aung San Suu Kyi has been sentenced to five years in prison on corruption charges)

Myanmar's Nobel laureate Aung San Suu Kyi
Myanmar: लष्करी -नागरी गटात चकमकी!

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लष्करी बंडानंतर सत्तेतून बाहेर गेलेल्या सू की (Aung San Suu Kyi) यांनी एका राजकीय सहकाऱ्याकडून सोने आणि हजारो डॉलर्स लाच घेतल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. या गुन्ह्यात जास्तीत जास्त 15 वर्षे शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. दुसरकीकडे, त्यांच्या समर्थकांनी आणि स्वतंत्र कायदेतज्ज्ञांनी या शिक्षेचा निषेध केला आहे. सू की यांना यापूर्वीच इतर खटल्यांमध्ये सहा वर्षांची शिक्षा झाली आहे.

इन-कॅमेरा सुनावणी

या शिक्षेचे वृत्त एका कायदा अधिकाऱ्याच्या हवाल्याने समोर आले आहे. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. राजधानी नापितामध्ये सू की यांच्यावरील सुनावणी इन-कॅमेरा पार पडली. यावेळी त्यांच्या वकिलांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर आणि स्यू की यांचे सरकार पडल्यानंतर म्यानमारमध्ये राजकीय अनागोंदी माजली. विशेष म्हणजे म्यानमारमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्यू की यांच्यावर अनेक आरोपांसाठी खटला चालवला जात असताना, दोषी ठरल्यास त्यांना अनेक दशके तुरुंगात घालवावी लागतील.

Myanmar's Nobel laureate Aung San Suu Kyi
न्यूयॉर्क कोर्टाचा ट्रम्प तात्यांना आदेश, दररोज भरा 10,000 डॉलरचा दंड

सू की नजरकैदेत आहेत

यापूर्वी आंग सान स्यू की यांना सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. ही प्रकरणे कोरोनाशी संबंधित नियमांचं उल्लंघन करणे, नागरिकांना सैन्याविरुद्ध भडकवणे आणि दूरसंचार संबंधित कायदा मोडणे याशी संबंधित आहेत. मात्र, सर्व आरोपांना तोंड देत सू की सध्या नजरकैदेत आहेत. म्यानमारबद्दल बोलायचे झाल्यास, येथील लोकांनी लष्करी उठावाला कडाडून विरोध केला आहे. लष्कराविरोधात ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. लष्करानेही जनतेचा आवाज दाबण्यासाठी सर्व पद्धती अवलंबल्या आहेत. त्यांनी 1700 हून अधिक लोकांची हत्या केली आहे. सत्तापालटानंतर 13000 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com