म्यानमारमधील राजकीय सत्त उलथवून लावत म्यानमार लष्करांनी आपली लष्करी सत्ता स्थापन केली. त्यानंतर देशात मोठ्याप्रमाणात हिंसाचार झाला. लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांनाही आपल्या ताब्यात घेत लष्करांनी सत्तेवर आपला कब्जा ठेवला. याच पाश्वभूमीवर आता म्यानमारच्या एका न्यायालयाने देशाच्या पदच्युत नेत्या आंग सान स्यू की (Aung San Suu Kyi) यांना बेकायदेशीरपणे वस्तूंची आयात केल्याबद्दल, 'वॉकी-टॉकीज' ठेवल्याबद्दल आणि कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. सोमवारी त्यांना आणखी चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सू की यांना गेल्या महिन्यात इतर दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणांमध्ये म्यानमारमधील (Myanmar) लोकशाहीवादी नेत्या स्यू की यांचे सरकार उलथून टाकून लष्कराने सत्ता हाती घेतल्यापासून त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. स्यू की यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावरील आरोपांचा उद्देश लष्कराच्या कृतींना वैध ठरवणे आणि त्यांना राजकारणात परत येण्यापासून रोखणे हा आहे.
सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळाला
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सू की यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला होता, परंतु लष्कराने म्हटले की, निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे. मात्र, या दाव्यावर स्वतंत्र निवडणूक निरीक्षकही साशंक होते. सू की यांचे समर्थक आणि स्वतंत्र विश्लेषकांनी म्हटलं की, आमच्यावरील सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. सर्व आरोपांमध्ये दोषी आढळल्यास त्यांना 100 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
डिसेंबर 2016 मध्ये चार वर्षांची शिक्षा झाली
लोकशाही समर्थक नेत्या सू की यांना 6 डिसेंबर रोजी इतर दोन आरोपांसाठी दोषी ठरविण्यात आले - COVID-19 निर्बंधांचे उल्लंघन करणे आणि लोकांना त्यांचे उल्लंघन करण्यास उद्युक्त करणे. यासंबंधी त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेनंतर लष्करी सरकारच्या प्रमुखाने त्यांच्या शिक्षा कमी केली होती. त्यांना लष्कराने अज्ञातस्थळी ठेवले आहे. सरकारी टेलिव्हिजनच्या वृत्तानुसार, त्या शिक्षा या अज्ञातस्थळीच भोगणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.