आई सेक्स पार्ट्या आयोजित करायची, मुलाने आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना मारले; वाचा संपूर्ण धक्कादायक प्रकरण!

America Crime News: आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या मुलाच्या आईवरही खटला सुरु आहे.
Jennifer Crumbley And James Crumbley
Jennifer Crumbley And James CrumbleyDainik Gomantak
Published on
Updated on

America Crime News: आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या मुलाच्या आईवरही खटला सुरु आहे. हे प्रकरण अमेरिकेतील आहे. इथे 2021 मध्ये एका मुलाने त्याच्याच हायस्कूलमधील चार विद्यार्थ्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. आता या हायप्रोफाईल प्रकरणाबाबत न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हत्येचा आरोप असलेल्या मुलाच्या आईवरही हत्येचा आरोप असून तिच्याविरुद्ध खटला सुरु आहे. आता आरोपी मुलाच्या आईबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. महिलेचे अनेक लोकांशी संबंध होते आणि ती स्वतः 'सेक्स पार्ट्या' आयोजित करत असे.

दरम्यान, जेनिफर क्रंबली वय वर्ष 45, आणि तिचा पती जेम्स क्रंबली वय वर्ष 47 यांच्यावर चार मनुष्यवधाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. अमेरिकेतील शाळांमध्ये गोळीबार आणि हत्यांच्या घटना रोज समोर येत आहेत. तथापि, अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे, जिथे पालकांना त्यांच्या मुलाच्या कृतीसाठी न्यायालयीन सुनावणीला सामोरे जावे लागत आहे.

Jennifer Crumbley And James Crumbley
America Crime News: अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बंदूकधाऱ्यांची दहशत, रॅपिड फायरिंगमध्ये 4 जणांचा मृत्यू

मिशिगनमधील ऑक्सफर्ड हायस्कूलमध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या गोळीबारात क्रंबली जोडप्याचा 17 वर्षांचा मुलगा एथन क्रंबली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या गोळीबारात 14 ते 17 वर्षे वयोगटातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. खून झालेल्या मुलाच्या आईच्या प्रियकराने खटल्यादरम्यान साक्ष दिली आहे. ब्रायन मेलोचे हा एथनची आई जेनिफरचा दीर्घकाळापासूनचा मित्र आहे. तो म्हणाला की, जेव्हा एथनने शाळेत फायरिंग केली तेव्हा दोघांचे प्रेमसंबंध होते. गुरुवारी साक्ष देताना, जेनिफरने पुष्टी केली की त्यांचे अफेअर होते. एका रिपोर्टनुसार, जेनिफर आणि फायर फायटर चीफ ब्रायन यांनी हॉटेलमध्ये सेक्स पार्ट्याही आयोजित केल्या होत्या.

न्यूयॉर्क पोस्टने सरकारी वकिलांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ॲडल्ट फ्रेंड फाइंडर नावाच्या स्विंगर्स ॲपवर ते अनेकदा अनोळखी व्यक्तीचा शोध घेत आणि त्यांच्याचसोबतच हॉटेलमध्ये "सेक्स पार्ट्या" आयोजित करत. अहवालात म्हटले आहे की, जेनिफरने स्वतः कबूल केले की ती या ॲपद्वारे 'इतर लोकांना' भेटली.

Jennifer Crumbley And James Crumbley
America Crime News : आधी घरातील सर्वांवर झाडल्या गोळ्या मग केली आत्महत्या; अमेरिकेतील भयावह घटना

दरम्यान, गुरुवारी मिशिगनच्या वकिल महोदयांनी ज्युरींना सांगितले की जेनिफर क्रंबली या प्रकरणात गुंतली होती. त्यामुळे ती तिच्या मुलाची काळजी घेण्यात अपयशी ठरली. तिला चार जणांचा मृत्यू टाळता आला असता. तिच्या मुलाचे मानसिक संतुलन सतत बिघडत असल्याचे वकिलांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, तिची इच्छा असती तर मुलाला थांबवू शकली असती. आपला मुलगा समाजासाठी घातक ठरत आहे हे तिला समजायला हवे होते. विशेष म्हणजे, त्याच्याकडे बंदूकही होती. "पुरावा तुम्हाला सांगतो की, तिने (मुलाच्या आईने) त्याच्या बंदुकीचे ट्रिगर खेचले नसावे, परंतु पीडितांच्या मृत्यूसाठी ती जबाबदार आहे," असे वकील महोदय पुढे म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले की, "त्याने केलेल्या कोणत्याही लहान, सोप्या गोष्टी नव्हत्या ज्यामुळे हे सर्व घडण्यापासून रोखता आले असते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com