Israel Hamas War: इस्त्रायली सैन्याचा राफाहमध्ये हैदोस; हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिकच गडद होत चालले आहे. इस्त्रायल अधिक आक्रमकरित्या हल्ले करत आहे.
israeli attack in rafah
israeli attack in rafahdainik gomantak

Israel Hamas War: इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिकच गडद होत चालले आहे. इस्त्रायल अधिक आक्रमकरित्या हल्ले करत आहे. काही दिवसांपूर्वीच इस्त्रायली लष्कराने हमासच्या ताब्यात असणाऱ्या चार महिला सैनिकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर इस्त्रायलचे हल्ले अधिक वाढले. इस्त्रायल सातत्याने गाझासह राफाह शहरावर हल्ले करत आहे. राफाह शहरावर केलेल्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी रात्री इस्रायलने हा हल्ला केला. काही दिवसांपूर्वी राफाहमधील विस्थापित पॅलेस्टिनींच्या छावणीला आग लागली होती. त्यावेळी, इस्रायली सैन्यांकडून सांगण्यात आले होते की, पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामुळे विस्थापितांच्या छावणीला आग लागली.

पीटीआयच्या वृत्तानुसार, आगीच्या घटनेबाबत इस्रायलचा प्राथमिक तपास अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. इस्त्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितले की, आगीचे कारण अद्याप तपासले जात आहे. मात्र हमासच्या (Hamas) टॉप कमांडरला लक्ष्य करुन आग लावण्यात आल्याची शक्यता कमी आहे.

israeli attack in rafah
Israel Hamas War: अनेकजण जिवंत जळाले, गाझा नंतर राफाहमध्ये इस्रायली नरसंहार; 24 तासांत 160 जणांचा मृत्यू

या आगीत 45 जणांचा मृत्यू झाला होता

गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या घटनेत 45 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, स्थानिक लोकांनी सांगितले की, दक्षिण गाझा शहरात लढाई तीव्र झाली आहे. इस्रायली हल्ले सुरु झाल्यापासून आतापर्यंत एक दशलक्ष लोक राफाहमध्ये विस्थापित झाले आहेत, त्यापैकी बहुतेक इस्रायल (Israel) आणि हमास यांच्यातील युद्धामुळे आधीच विस्थापित झाले आहेत. त्यांनी युद्धग्रस्त भागातील छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.

israeli attack in rafah
Israel Hamas War: ‘’गाझावर अणुहल्ला होऊ द्या, इस्रायल युद्ध हरु शकत नाही’’, अमेरिकन खासदाराच्या वक्तव्याने गोंधळ

इस्रायली लष्कर राफाहमध्ये!

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा खात्मा करण्यासाठी आणि 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर ओलीस ठेवलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी आपले सैन्य राफाहमध्ये प्रवेश करतील, असे यापूर्वी सांगितले होते. रविवारी रात्री ज्या भागात हमासच्या कथित सेंटरला लक्ष्य करण्यात आले त्याच भागात हा हल्ला करण्यात आला. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यामुळे विस्थापित पॅलेस्टिनींच्या सेंटरला आग लागली, ज्यामध्ये 45 लोक ठार झाले. याबाबत जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com