Mohammad Ali Jinnah: जिनांच्या धर्मासंबंधी मोठा खुलासा! गुजरातमधील या गावाशी होतं नातं

India Pakistan Partition: मोहम्मद अली जिना यांच्या वडिलांचे नाव जेनाभाई ठक्कर होते.
Mohammad Ali Jinnah
Mohammad Ali JinnahDainik Gomantak

Jinnah's Relationship With India: फाळणीचे खलनायक मोहम्मद अली जिना यांचा जन्म अविभाजित कराची शहरात झाला होता. मोहम्मद अली जिना यांच्या वडिलांचे नाव जेनाभाई ठक्कर असे होते. जेनाभाई ठक्कर व्यवसायाच्या शोधात गुजरातहून कराचीला पोहोचले होते. जेनाभाईंनी आपल्या मुलाचे नाव मोहम्मद अली जेनाभाई असे ठेवले, कारण गुजरातच्या या भागात मुलाच्या नावाला वडिलांचे नाव जोडले जाते. मात्र मोहम्मद अली जिना लंडनला पोहोचल्यावर त्यांनी आपले नाव बदलून मोहम्मद अली जिना असे केले.

सरदार पटेलांनी जीनांची ही मोठी योजना अयशस्वी केली

मोहम्मद अली जिना हे भारत-पाकिस्तान फाळणीचे सर्वात मोठे खलनायक मानले जातात. देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी मोहम्मद अली जिना हे भारताविरुद्धच्या (India) कटात सामील होते. सौराष्ट्राचा मोठा भाग पाकिस्तानात (Pakistan) सामील करण्याचा डाव होता, पण याच गुजरातचे सुपुत्र सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलादी हेतूंपुढे सर्व कारस्थाने फसली. जिना अयशस्वी ठरले. सौराष्ट्र आणि मध्य भारतातील सर्व संस्थानांचे विलीनीकरण करुन, सरदार पटेलांनी ते अखंड भारताचा एक भाग बनवले.

Mohammad Ali Jinnah
Imran Khan: अमेरिका मालक, पाकिस्तान भाड्याची बंदूक; इम्रान खान विरोधकांवर हल्लाबोल

जिना हे पुंजाभाई ठक्कर यांचे नातू होते

मोहम्मद अली जिन्ना ज्यांचा जन्म कराची येथे झाला होता, कराची हे देखील अविभाजित भारतामधील प्रमुख शहर होते. मोहम्मद अली जिना यांचे आजोबा पुंजाभाई ठक्कर गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील मोती पनेली गावात संपूर्ण कुटुंबासह राहत असत. मोहम्मद अली जिना हे पुंजाभाई ठक्कर यांचे धाकटे पुत्र जेनाभाई ठक्कर यांचे पुत्र होते. इतिहासकारांच्या मते, वयाच्या 16 व्या वर्षी मोहम्मद अली जिना यांचा विवाह गुजरातमधील मोती पनेली गावातील अमीबाईशी झाला होता. पण लग्नानंतर मोहम्मद अली जिना आणि अमीबाई यांची भेट झालीच नाही.

जिना यांचे कुटुंब हिंदू होते

मोहम्मद अली जेनाभाई म्हणजेच जिना यांच्या कुटुंबाने मासळीचा व्यापार सुरु केला होता. जिना यांचे कुटुंब हिंदू होते, लोहानी हे ठक्कर समाजातील होते, त्यामुळे समाजातील लोकांनी या मासळी व्यवसायाला विरोध केला. इतिहासकार मानतात की, मासळीच्या व्यापाराला विरोध झाला तेव्हा जेनाभाई ठक्कर यांच्या कुटुंबाने इस्लाम स्वीकारला आणि खोजा मुस्लिम झाले. इतकेच नाही तर जिना यांचे कुटुंब तत्कालीन नवाबांच्या संपर्कात आले होते, हे देखील धर्म परिवर्तनाचे प्रमुख कारण मानले जाते. कालांतराने जिनांनी आपले नाव मोहम्मद अली जेनाभाईवरुन बदलून मोहम्मद अली जिना केले.

Mohammad Ali Jinnah
FATF Meeting: 'एफएटीएफ'च्या ग्रे यादीतून पाकिस्तान बाहेर पडणार?

मोती पानेली गावात जिनांचे कुटुंबीय घर आहे

मोहम्मद अली जिना यांचे हे घर आजही गुजरातमधील (Gujarat) मोती पानेली गावात आहे. सध्या या घरात पटेल कुटुंब राहत असले तरी हे घर आजही जिना वाले घर या नावाने ओळखले जाते. ही इमारत खूप जुनी आहे. या घरात राहणारे पटेल कुटुंब जीनांच्या नावाने कंटाळले आहे, त्यांना जीनांचे नावही ऐकावेसे वाटत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com