Watch Video: वैद्यकीय क्षेत्रातील मोठी घडामोड! मानवाला बसवली चक्क डुक्कराची किडनी

अमेरिकेत नुकतेच मानवाला चक्क डुक्कराची किडनी लावण्यात आली असून, 32 दिवसांपासून किडनी व्यवस्थित कार्य करत आहे.
Pig kidney transplanted into a human in USA
Pig kidney transplanted into a human in USA
Published on
Updated on

Pig kidney transplanted into a human in USA: अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत दररोज अनेकांचा मृत्यू होतो. अवयवदानासाठी लोकांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. पण तरीही मागणीनुसार त्यांची उपलब्धता खूपच कमी आहे. यावर मात करण्यासाठी संशोधकांकडून प्राण्यांचे अवयव मानवी शरीरात रोपण करण्याचे प्रयोग केले जात आहेत.

अमेरिकेत नुकतेच मानवाला चक्क डुक्कराची किडनी लावण्यात आली असून, 32 दिवसांपासून किडनी व्यवस्थित कार्य करत आहे.

ब्रेन डेड घोषित झालेल्या व्यक्तीमध्ये किडनी प्रत्यारोपण केले आहे. विशेष म्हणजे मानवी शरीरात प्रत्यारोपित किडनी 32 दिवसांपासून व्यवस्थित काम करत आहे.

या व्यक्तीला चक्क डुक्कराची किडनी लावण्यात आली आहे. प्राण्यांच्या अवयवांचे मानवामध्ये प्रत्यारोपण करणे याला झेनोट्रान्सप्लांट म्हणतात. वैद्यकीय क्षेत्रात मोठी घडामोड मानली जात आहे.

Pig kidney transplanted into a human in USA
कदंबची बस आलीच नाही पेडणे बसस्थानकावर वयस्कर महिला अडकून पडली, अखेर मदतील पिंक फोर्स धावली

न्यूयॉर्क विद्यापीठातील लँगोन ट्रान्सप्लांट इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी गेल्या महिन्यात हे प्रत्यारोपण केले होते. अशाप्रकारचे हे पाचवे प्रत्यारोपण आहे. या व्यक्तीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

या प्रत्यारोपणातील विशेष बाब म्हणजे डुकराच्या किडनीच्या जनुकामध्ये फक्त एकच बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 2021 मध्ये झालेल्या संशोधनात किडनीच्या जनुकामध्ये सुमारे 10 बदल करण्यात आले होते. या एका बदलामुळे किडनीला मानवी शरीराद्वारे अति तीव्र प्रमाणात होणाऱ्या विसंगतीपासून संरक्षण मिळाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com