पहिल्या लाईनमध्ये मोदी, आपला वाला कुठायं? COP समिटमधील राष्ट्र प्रमुखांचा फोटो पाहून यूजर्संनी उडवली पाक PM ची खिल्ली

World Climate Action Summit: हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी दुबईत वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट (COP 28 समिट) सुरु आहे.
World Climate Action Summit
World Climate Action SummitDainik Gomantak

World Climate Action Summit: हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी दुबईत वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट (COP 28 समिट) सुरु आहे. संयुक्त अरब अमिराती यावेळी COP शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे. जगभरातील देशांचे प्रमुख या शिखर परिषदेला पोहोचले आहेत. दुबईत होणाऱ्या या समिटमध्ये पीएम मोदीही सहभागी झाले आहेत. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी शेजारी देश पाकिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान अन्वारुल हकही आले होते. यावेळी, जागतिक नेत्यांचा एक फोटो समोर आला, ज्यामध्ये पीएम मोदी समोर उभे आहेत. हा फोटो समोर येताच पाकिस्तानींनी आपल्याच पंतप्रधानांची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

पाकिस्तानचे पंतप्रधान कुठे आहेत?

पाकिस्तानच्या राजकीय विश्लेषकांपैकी एक कमर चीमा यांनी सर्व नेत्यांचे फोटो शेअर केले आहेत. चीमा यांनी फोटो शेअर करत म्हटले की, पंतप्रधान मोदी पहिल्या रांगेत दिसत आहेत, कृपया मला फोटोमध्ये आपले पंतप्रधान शोधण्यात मदत करा. एका यूजरने पाकिस्तानी पंतप्रधानांना शोधण्याचा प्रयत्न केला. आरजू कामजी नावाच्या युजरने सांगितले की, पाकिस्तानी पंतप्रधान उजव्या बाजूने मागच्या रांगेत उभे असल्याचे दिसत आहेत.

World Climate Action Summit
UN Climate Summit मध्ये भारतातील पुराचा ब्रिटिश राजे चार्ल्स यांनी उपस्थित केला मुद्दा; म्हणाले...

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 2028 मध्ये संयुक्त राष्ट्र हवामान परिषद किंवा COP33 चे भारतात आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि लोकांच्या सहभागातून 'कार्बन सिंक' तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणारा 'ग्रीन क्रेडिट' उपक्रम सुरु केला. दुबईत संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेदरम्यान राष्ट्र आणि सरकार प्रमुखांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, विकास आणि पर्यावरण संरक्षण यांच्यातील समतोल राखून भारताने जगासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे.

दुसरीकडे, भारत हा जगातील अशा काही देशांपैकी एक आहे, जो 1.5 अंश सेल्सिअस तापमानवाढ मर्यादित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर निर्धारित योगदान किंवा राष्ट्रीय योजना साध्य करण्याच्या मार्गावर आहे. COP28 चे अध्यक्ष सुलतान अल जाबेर आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदलाचे अध्यक्ष सायमन स्टिल यांच्यासह उद्घाटन पूर्ण सत्राला उपस्थित राहणारे मोदी हे एकमेव नेते होते.

World Climate Action Summit
Saudi Arabia: भारताच्या एका खेळीने सौदी नमला; कच्चा तेलाबाबत घेतला महत्वाचा निर्णय

तसेच, पंतप्रधानांनी हवामान बदलामध्ये संतुलन राखण्याचे आवाहन केले आणि जगभरातील ऊर्जा संक्रमण "समान आणि सर्वसमावेशक" असणे आवश्यक असल्याचे सांगितले. विकसनशील देशांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी श्रीमंत देशांकडून तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची मागणी त्यांनी केली. पंतप्रधान 'पर्यावरणासाठी जीवन' मोहिमेची वकिली करत आहेत. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या अभ्यासाचा दाखला देत ते म्हणाले की, या पद्धतीमुळे कार्बन उत्सर्जन दोन अब्ज टनांपर्यंत कमी होऊ शकते. मोदी म्हणाले की, सर्वांचे हित जपले पाहिजे आणि हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com