Viral Video: रॅम्प वॉक अन् काळजाचा ठोका चुकला! भर स्टेजवर मॉडेलसोबत घडला अघटित प्रकार; पुढ जे घडलं ते तुम्हीच बघा

Viral Video Model Teeth Falling on Stage: ग्लॅमर आणि सौंदर्याच्या जगात वावरताना प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी लागते, मात्र कधीकधी नशिबात काहीतरी वेगळेच असते.
Viral Video Model Teeth Falling on Stage
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Miss Grand Thailand 2026 Viral Video: ग्लॅमर आणि सौंदर्याच्या जगात वावरताना प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असावी लागते, मात्र कधीकधी नशिबात काहीतरी वेगळेच असते. अशीच एक धक्कादायक पण तितकीच प्रेरणादायी घटना 'मिस ग्रँड थायलंड 2026' च्या मंचावर घडली. या स्पर्धेतील एका मॉडेलचे रॅम्प वॉकदरम्यान तोंडात बसवलेले नकली दात निसटून खाली पडले. मात्र, ही अत्यंत मानहानीकारक ठरु शकणारी परिस्थिती मॉडेलने ज्या धैर्याने हाताळली, त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत असून तिचे कौतुक केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 26-27 मार्च 2026 रोजी 'मिस ग्रँड थायलंड'च्या प्रिलिमिनरी राउंड दरम्यान घडली. 'मिस ग्रँड पाथुम थानी'चे प्रतिनिधित्व करणारी कमोलवान चनागो हिच्यासोबत हा प्रकार घडला. ती मंचावर अतिशय आत्मविश्वासाने आपले नाव आणि परिचय देत असताना अचानक तिचे नकली दात तोंडातून निसटले आणि बाहेर आले. एका क्षणासाठी संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली आणि प्रेक्षकही थक्क झाले. कोणत्याही मॉडेलसाठी हा क्षण अत्यंत लाजिरवाणा ठरु शकला असता, मात्र कमोलवानने डगमगून न जाता प्रसंगावधान राखले.

Viral Video Model Teeth Falling on Stage
Viral Video: शिंगाला शिंग भिडलं अन् उडाला थरार! भररस्त्यात सांडांची थरकाप उडवणारी झुंज; युजर म्हणाले, ''हा नक्कीच गर्लफ्रेंडचा मॅटर दिसतोय''

तिने जराही न घाबरता किंवा गोंधळून न जाता, त्वरित आपले दात हातात धरले आणि कॅमेऱ्यापासून तोंड वळवून प्रेक्षकांकडे पाठ केली. काही सेकंदातच तिने ते दात पुन्हा व्यवस्थित बसवले आणि पुन्हा कॅमेऱ्याकडे पाहून स्मितहास्य करत आपला परिचय पूर्ण केला. इतकेच नाही, तर तिने उर्वरित रॅम्प वॉक अशा जोशात पूर्ण केला की जणू काही झालेच नाही. तिच्या या कमालीच्या आत्मविश्वासाने प्रभावित होऊन प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले आणि तिचे मनोबल वाढवले.

Viral Video Model Teeth Falling on Stage
Dance Viral Video: जिममध्ये साडीचा स्वॅग! काळ्या साडीत ट्रेडमिलवर तरुणीने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'विषय हार्ड!'

हा व्हिडिओ 'एक्स' वर @banditmapache_ या हँडलवरुन शेअर करण्यात आला असून, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर या घटनेला "Embarrassing yet Inspiring" असे संबोधले जात आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी यावर अधिकृत भाष्य केले नसले तरी नेटकऱ्यांनी मात्र कमोलवानला खऱ्या अर्थाने 'चॅम्पियन' म्हटले. लाईव्ह स्टेजवर कोणत्याही तांत्रिक किंवा वैयक्तिक अडचणी आल्या तरी खचून न जाता स्मितहास्य करत पुढे जाणे, हेच एका खऱ्या विजेत्याचे लक्षण असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com