Mikey Hothi: कॅलिफोर्नियाला मिळाला पहिला शीख 'महापौर', होथींकडे लोदी शहराची कमान

California News: मिकी होथी यांची उत्तर कॅलिफोर्नियातील लोदी शहराच्या महापौरपदी एकमताने निवड झाली आहे.
Mikey Hothi
Mikey HothiDainik Gomantak
Published on
Updated on

Mikey Hothi becomes first Sikh mayor of Lodi: मिकी होथी (Mikey Hothi) यांची उत्तर कॅलिफोर्नियातील लोदी शहराच्या महापौरपदी एकमताने निवड झाली आहे. शहराच्या इतिहासात सर्वोच्च पद भूषवणारे ते पहिले शीख बनले आहेत. होथींचे आई-वडील भारतीय आहेत. नोव्हेंबरमध्ये महापौर मार्क चँडलर यांच्या जागेसाठी निवडणूक जिंकलेल्या नवनिर्वाचित नगरसेवक लिसा क्रेग यांनी होथी यांना नामनिर्देशित केले आणि बुधवारच्या बैठकीत एकमताने महापौर म्हणून निवडून आले.

होथी हे उपमहापौर झाले आहेत

होथी कौन्सिलच्या पाचव्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या वर्षी महापौर चँडलर यांच्या अंतर्गत उपमहापौर म्हणून त्यांनी काम पाहिले होते. चँडलर यांनी गेल्या उन्हाळ्यात जाहीर केले होते की, 'मी पुन्हा निवडणूक घेणार नाही.' तर होथी यांनी शुक्रवारी ट्विट करत सांगितले की, "लोदी शहराचे 117 वे महापौर (Mayor) म्हणून शपथ घेतल्याचा मला अभिमान आहे." स्थानिक वृत्तपत्र द लोदी न्यूज-सेंटिनेलने सांगितले की, आर्मस्ट्राँग रोडवर गुरुद्वारा उभारण्यात होथी यांच्या कुटुंबाचाही सहभाग होता. हे त्यांचे महत्त्वाचे योगदान होते.

Mikey Hothi
Zelenskyy-Biden Meet: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अचानक अवतरले अमेरिकेत

लोदी का प्रिय आहे

या यशानंतर आनंद व्यक्त करताना होथी म्हणाले की, 'माझा अनुभव माझ्या आधी आलेल्या ग्रीक समुदाय, जर्मन, हिस्पॅनिक (स्पॅनिश भाषिक) समुदायासारखाच आहे.' ते पुढे म्हणाले की, 'प्रत्येकजण लोदीकडे आला. हे एक सुरक्षित शहर आहे. या शहरात उत्तम शिक्षण (Education), महान लोक, महान संस्कृती, महान मूल्ये आणि फक्त कष्टकरी लोक आहेत. पुढील महापौर म्हणून या समुदयाचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो.'

Mikey Hothi
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींशी साधला संवाद

दुसरीकडे, होथी यांचे आई-वडील पंजाबचे (Punjab) असून त्यांनी 2008 मध्ये टोके हायस्कूलमधून शिक्षण घेतले. होथी पुढे म्हणाले की, 'शहरात लहानाचे मोठे होणे हे एक आव्हान होते, विशेषत: 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर, जेव्हा अनेक मुस्लिम आणि शीखांना अवाजवी छळ सहन करावा लागला. परंतु लोदीमध्ये माझे कुटुंब केवळ टिकले नाही तर भरभराटही झाली.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com