मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट करणार

''उच्च प्रतिभा आणि गुणवत्ता असलेल्या सर्व कंचाऱ्यांचे पगार दुप्पट करणार''
Microsoft
Microsoft Dainik Gomantak
Published on
Updated on

जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनी पैकी एक मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आहे. या कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे, याबाबत कर्मचार्‍यांना एक ईमेल पाठवत सांगितले की, मायक्रोसॉफ्टमधील उच्च प्रतिभा आणि गुणवत्ता असलेल्या सर्व कंचाऱ्यांचे पगार आपण जवळपास दुप्पट करणार आहोत. (Microsoft will double the salaries of its employees - Satya Nadella )

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या कामाचे नेहमीच कौतुक करतात. त्यांनी आपल्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, कंपनीच्या टॅलेंटला खूप मागणी आहे आणि यामुळे आम्हाला वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो. तुम्ही आमच्यासाठी मौल्यवान आहात आणि ग्राहक आणि भागीदारांना सक्षम बनवण्याचे उत्तम काम करत आहोत.

सत्या नाडेला म्हणाले की, आम्ही आमचे जागतिक गुणवत्ता बजेट दुप्पट करत आहोत. त्याचे फायदे वेगवेगळ्या मार्केट डेटाच्या आधारे देशानुसार बदलतील आणि जास्तीत जास्त पगार वाढ बाजाराची मागणी कुठे आहे, यावर अवलंबून असेल. 67 किंवा त्यापेक्षा कमी स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांचे दरवर्षी किमान 25 टक्क्यांनी स्टॉक रेंज वाढवणार आहे. हा ईमेल मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मायक्रोसॉफ्ट व्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात आधीच वाढ केली असून यामध्ये अॅमेझॉनचे नाव अग्रस्थानी आहे. फेब्रुवारीमध्येच अॅमेझोन ने कॉर्पोरेट आणि आयटी कर्मचार्‍यांसाठी मूळ वेतन दुप्पट केले आहे. तसेच मायक्रोसॉफ्ट ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आहे. जी संगणक सॉफ्टवेअर, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, वैयक्तिक संगणक आणि संबंधित सेवांचे उत्पादन करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com