3000 कोटींचं एयरक्राफ्ट, 300 फरारी, 500 रोल्स रॉयस....बादशाहाचं आयुष्य जगणारा हा आहे तरी कोण?

Hassanal Bolkiah Net Worth: देशात आणि जगात असे अनेक लोक आहेत जे अमाप संपत्तीचे मालक आहेत.
Hassanal Bolkiah Net Worth
Hassanal Bolkiah Net WorthDainik Gomantak

Hassanal Bolkiah Net Worth: देशात आणि जगात असे अनेक लोक आहेत जे अमाप संपत्तीचे मालक आहेत. आज आम्ही तुम्हाला ब्रुनेईचे सुलतान हसनल बोलकिया इब्नी उमर अली सैफुद्दीन III यांच्याबद्दल सांगणार आहोत.

5 ऑक्टोबर 1967 रोजी त्यांच्या वडिलांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते ब्रुनेईचे सुलतान बनले. ते जगातील अशा काही राजांपैकी एक आहेत, ज्यांची संपत्ती US $30 अब्जांपेक्षा जास्त आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक हसनल बोलकिया यांचा जन्म 15 जुलै 1946 रोजी ब्रुनेई शहरात झाला. 1967 मध्ये, त्यांनी युनायटेड किंगडममधील (United Kingdom) रॉयल मिलिटरी अकादमी सँडहर्स्टमधून पदवी प्राप्त केली.

ऑगस्ट 1968 मध्ये बोलकिया सुलतान झाले

दरम्यान, क्वालालंपूरमधील व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशनमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते यूकेला गेले. हसनल बोलकिया ऑगस्ट 1968 मध्ये सुलतान झाले. आज ते त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात.

ब्रुनेईच्या सुलतानच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत तेलाचे साठे आणि नैसर्गिक वायू आहेत. सुलतान हसनाल बोलकिया इस्ताना नुरुल इमान पॅलेसमध्ये राहतात, जो 2 दशलक्ष स्क्वेअर फूटच्या विशाल भागात पसरलेला आहे.

Hassanal Bolkiah Net Worth
Donald Trump: 'सत्तेवर आलो तर आम्हीही...', डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

राजवाड्यात 1700 पेक्षा जास्त रुम आहेत

दुसरीकडे, हसनल बोलकिया यांचा राजवाडा जगातील सर्वात मोठा राजवाडा म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट आहे. एवढेच नाही तर राजवाड्याच्या घुमटावर 22 कॅरेट सोन्याचा लेप लावण्यात आला आहे.

एका अंदाजानुसार या महालाची किंमत 2550 कोटी रुपये आहे. या पॅलेसमध्ये पाच स्विमिंग पूल, 257 बाथरुम आणि 1700 हून अधिक खोल्या आहेत. राजवाड्यात 200 घोड्यांचे तबेले आणि वातानुकूलित 110 गॅरेज आहेत.

Hassanal Bolkiah Net Worth
Report: जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या राहते 'या' 20 शहरात!

7000 वाहनांचा ताफा

डेली मेलच्या वृत्तानुसार, सुलतान बोलकिया यांनी त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी बोईंग 747 खरेदी करण्यासाठी 3,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. जेटमध्ये US $120 दशलक्षचे वॉश बेसिन आहे.

अहवालानुसार, ब्रुनेईच्या सुलतानकडे 7,000 वाहनांचा ताफा आहे, ज्यात 300 फेरारी आणि 500 ​​रोल्स रॉयसेसचा समावेश आहे.

GQ च्या अहवालानुसार, हसनल बोलकिया हे एका खाजगी प्राणीसंग्रहालयाचे मालक आहेत, ज्यात 30 बंगाली वाघ आहेत. सुलतान केस कापण्यासाठी 20000 अमेरिकन डॉलर्स खर्च करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com