पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ ( PTI) सरकारवर निशाणा साधला. इम्रान सरकार आपल्या चुकीच्या धोरणांमुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना रहमान म्हणाले की, आम्ही देशाच्या अस्तित्वासाठी युद्ध लढत आहेत, असे द न्यूज इंटरनॅशनलने म्हटले आहे. ते म्हणाले पुढे की, बांग्लादेश (Bangladesh) आणि युद्धग्रस्त अफगाणिस्तानची (Afghanistan) अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा (Pakistan) चांगली आहे. (Maulana Fazlur Rehman Lashed Out At Imrans Government)
दरम्यान, मौलाना फजलुर रहमान (Maulana Fazlur Rehman Lashed) यांनी आगामी स्थानिक निवडणुकीत प्रामाणिक आणि निष्पक्ष उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. पीडीएम प्रमुख पुढे म्हणाले, 'पीटीआय उमेदवारांना मतदान करणे म्हणजे राज्यकर्त्यांच्या अपरिपक्व धोरणांना खतपाणी देणे. गेल्या तीन वर्षात अकार्यक्षम राज्यकर्त्यांकडे जनतेच्या हितासाठी काहीही ठोस नव्हते. इतर राजकीय पक्षांचा जनादेश आपल्याकडे घेण्यासाठी निवडणुका दोन टप्प्यात घ्यायच्या होत्या. मात्र अशा कोणत्याही हालचालींना विरोध केला जाईल.'
देशातील वाढत्या महागाईचा संदर्भ देत रेहमान म्हणाले की, 'खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती, औषधे आणि महागाई हा देशाचा खरा प्रश्न आहे, मात्र गेल्या तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून मोठी कर्जे घेऊनही सरकारकडे कोणतीही ताकद नाही. ते पुढे म्हणाले की, देशात दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती वाढल्याने आणि बेरोजगारीमुळे तरुणांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे.'
शिवाय, ते पुढे म्हणाले, 'देशातील प्रत्येक क्षेत्र उद्ध्वस्त करुन जनतेची लूट करणारे माफिया सरकार आहे. या नालायक सरकारने तूप, तेल, मैदा, साखर, औषधांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यांच्या राजवटीत वीज, पेट्रोलियम आणि गॅसच्या किमतीही अनेक पटींनी वाढल्या आहेत. सध्याच्या सरकारने घाईघाईने कायदे करुन देशाची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेकडे गहाण ठेवली आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.