Spain’s nightclub Massive fire
Spain’s nightclub Massive fireDainik Gomantak

स्पेनमधील नाईट क्लबला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढू शकतो

Spain’s nightclub Massive fire: दक्षिण-पूर्व स्पेनमधील मर्सिया येथे रविवारी सकाळी एका नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे.
Published on

Spain’s nightclub Massive fire: दक्षिण-पूर्व स्पेनमधील मर्सिया येथे रविवारी सकाळी एका नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी सुरक्षा आणि बचाव कर्मचारी मदतकार्यात गुंतले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्पेनच्या आपत्कालीन सेवांनी वर्तवली आहे.

सकाळी सहा वाजता अपघाताची माहिती मिळाली

सोशल मीडियावर (Social Media) दिलेल्या निवेदनात, स्पेनच्या आपत्कालीन सेवांनी म्हटले आहे की, अतापर्यंत सहा लोक गंभीर जखमी झाल्याचे आढळले आहे. स्थानिक वेळेनुसार (0400 GMT) सकाळी 6 वाजता आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

यानंतर सुरक्षा कर्मचारी मदतकार्यासाठी इमारतीत दाखल झाले. त्यांनी सांगितले की, मृतांची संख्या सात आहे.

Spain’s nightclub Massive fire
Turkey Blast: तुर्कीच्या संसदेजवळ आत्मघातकी हल्ला, हल्लेखोराने स्वतःला उडवले; दुसरा गोळीबारात ठार!

स्पेनच्या आपत्कालीन सेवांनी फोटो जारी केले

स्पेनच्या आपत्कालीन सेवांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंनुसार, फोंडा मिलाग्रोस म्हणून ओळखल्या जाणार्‍या टिटर नाईट क्लबमध्ये आग लागली. इमारतीच्या छतावरुन धूर येताना दिसत आहे.

स्थानिक पोलिस (Police) प्रवक्त्याने सांगितले की, शनिवारी रात्री क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी सुरु होती. मात्र, पार्टीत किती लोक उपस्थित होते याची कोणतीही माहिती नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Spain’s nightclub Massive fire
Pakistan Blast Video: पाकिस्तानमध्ये आत्मघातकी स्फोटात 9 पोलिस ठार, 13 जखमी

मर्सियामध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला

राष्ट्रीय पोलिसांचे प्रवक्ते डिएगो सेरालो यांनी रेडिओ ओंडा रिजनल डी मर्सियाला सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार दोन मजली नाईट क्लबच्या पहिल्या मजल्यावर आग लागली.

अग्निशमन दलाने जारी केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये आगीची भीषणता दिसून येते. या घटनेबद्दल देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

त्यांनी पीडित लोकांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. या आगीत आणखी चार जण जखमी झाल्याची माहिती आहे, ज्यात 22 आणि 25 वर्षांच्या दोन मुली आणि 40 वर्षांच्या दोन पुरुषांचा समावेश आहे. या लोकांना धुराचा त्रास होत आहे. मर्सियाचे महापौर जोसे बॅलेस्टा यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com