सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या मलेशियन व्यक्तीला (Indian Origin Malaysian Man) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सिंगापूर सरकारने म्हटले आहे की, हेरॉइन तस्करी प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला तो कोणता गुन्हा करत आहे याचे चांगलेच भान होते. 33 वर्षीय नागेंद्रन के. धर्मालिगमला (Nagendran K. Dharmaligam) बुधवारी चांगी तुरुंगात (Malaysian man of Indian origin) फाशी देण्यात येणार आहे. सिंगापूर आणि पेनिनसुलर मलेशिया दरम्यानच्या 'कॉजवे लिंक'वर वुडलँड्स नाका येथे अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात धर्मलिंगमला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, त्याने मादक पदार्थाचे बंडल आपल्या मांडीला बांधले होते. 2009 मध्ये 42.72 ग्रॅम हेरॉईन तस्करी केल्याप्रकरणी या व्यक्तीला 2010 मध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अंमली पदार्थांच्या गैरवर्तन कायद्यांतर्गत, 15 ग्रॅमपेक्षा जास्त तस्करी झाल्यास मृत्यूदंडाची तरतूद आहे (Death Penalty in Singapore). गेल्या महिन्यात ही बाब उघडकीस आली, जेव्हा सिंगापूर तुरुंग सेवेने धर्मलिंगमच्या आईला 26 ऑक्टोबरला पत्र लिहून तिच्या मुलाला 10 नोव्हेंबरला फाशी देण्यात येणार असल्याची माहिती दिली, असे स्ट्रेट्स टाईम्सने वृत्त दिले.
10 नोव्हेंबरला कुटुंबीयांची भेट होईल
या कुटुंबाला 10 नोव्हेंबरपर्यंत भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. लोकांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले. स्ट्रेट टाईम्सने गृह मंत्रालयाच्या निवेदनाचा हवाला देऊन गुन्हा करताना प्रकरणाचे गांभीर्य समजून घेण्याऱ्या व्यक्तीच्या मानसिक क्षमतेचाही विचार केला. या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मानवाधिकार गट (Human Rights Group) आणि इतरांनी इंटेलेक्चुअल डिसेब्लिटीच्या आधारावर फाशीची शिक्षा न देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने मानसशास्त्रज्ञांच्या पुराव्याचे मूल्यांकन केले होते. दोषीला तो काय करत आहे याची चांगली समज होती.
आरोपींनी शिक्षेला विरोध केला
आरोपीने शिक्षेविरुद्ध अपील न्यायालयात अपील केले होते परंतु सप्टेंबर 2011 मध्ये त्याचे अपील फेटाळण्यात आले. नंतर त्याने 2015 मध्ये त्याची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यासाठी अपील देखील दाखल केले, परंतु उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज 2017 मध्ये आणि नंतर 2019 मध्ये अपील न्यायालयाने (Nagaenthran K Dharmalingam Petition) फेटाळला. राष्ट्रपती हलिमा याकूब यांनीही त्याचा दयेचा अर्ज फेटाळला. त्याची फाशीची शिक्षा माफ करण्याबाबत 29 ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आणि शनिवारी सकाळपर्यंत 56,134 हून अधिक जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.