Viral Video: बऱ्याचदा लोक रंग-रुप बदलण्यासाठी कधी कान टोचतात तर कधी अंगावर टॅटू काढतात. काही बहाद्दर तर प्लास्टिक सर्जरीची मदतही घेतात. पण अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने असे बॉडी मॉडिफिकेशन केले आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच्या सर्जरीचा रिझल्ट पाहता लोकांनी डोक्यावर हात मारला. तर अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, ट्रान्स लोकांसाठी हा फायद्याचा सौदा आहे.
दरम्यान, येथे आम्ही कोलोरॅडोच्या हॅरी हूफक्लोपेनबद्दल बोलत आहोत, ज्याने सर्जरीच्या माध्यमातून आपल्या शरीरावर चार अतिरिक्त सिलिकॉन निप्पल इम्प्लांट केले. म्हणजेच आता या व्यक्तीला सहा निप्पल आहेत. यासाठी हॅरीने पहिल्यांदा बॉडी मॉडिफिकेशन तज्ज्ञ स्टीव्ह हॉवर्थ यांच्याकडून असे करणे शक्य आहे का याबद्दल सल्ला घेतला होता. जेव्हा स्टीव्ह यांनी सहमती दर्शवली तेव्हा हॅरीने त्याच्या छातीखाली आणि पोटाजवळ चार लहान सिलिकॉन निप्पल इम्प्लांट केले.
हॅरीने सांगितले की, या निप्पलला पूर्णपणे दुरुस्त होण्यासाठी चार महिने लागले. पण तरीही त्याच्यात खरी फिलिंग नव्हती. यानंतर टॅटू आर्टिस्ट एंजलच्या मदतीने त्याने टॅटू बनवून घेतला.
दरम्यान, सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर यासंबंधीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओवर टॅटू आर्टिस्टने लिहिले की, ‘’हे इम्प्लांट अनेकांचे आयुष्य बदलणारे ठरु शकते. मला आशा आहे की वैद्यकीय क्षेत्र लवकरच त्याचा अवलंब करण्यास तयार होईल, कारण हा आतापर्यंतचा सर्वोत्तम रिझल्ट आहे.’’
दुसरीकडे, टॅटू आर्टिस्ट आणि बॉडी मॉडिफिकेशन एक्सपर्टचे काम पाहून अनेक लोक प्रभावित झाले. त्यांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, ट्रान्स लोकांसाठी हा एक फायद्याचा सौदा ठरु शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.