Video: मालदीवच्या रस्त्यावर धर्मांधाचा नंगानाच, मंत्र्यांवर केला हल्ला

Maldives: मालदीवची राजधानी असलेल्या मालेच्या रस्त्यावर कट्टरवादी विचारसरणीचा नमुना पाहायला मिळाला.
Maldives
MaldivesDainik Gomantak
Published on
Updated on

Maldives: मालदीवची राजधानी असलेल्या मालेच्या रस्त्यावर कट्टरवादी विचारसरणीचा नमुना पाहायला मिळाला. येथील मंत्र्यावरच एका व्यक्तीने हल्ला केला. मात्र, मंत्रिमहोदयांनी कसे तरी जीव वाचवून तिथून पळ काढला. यानंतरही हल्लेखोर चाकू घेऊन आरडाओरड करतच होता. ही घटना सोमवारी दुपारी घडली. मालदीवचे पर्यावरण राज्यमंत्री अली सोलिह (Minister of State for Environment Ali Solih) त्यांच्या स्कूटीवरुन जात होते.

कुराणाचे पठन केल्यानंतर हल्ला केला

या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हुलहुमले येथे ते स्कूटीवरुन जात असताना हल्लेखोराने पुढे येऊन त्यांना अडवले, असे सांगितले जात आहे. यानंतर त्याने कुराणातील काही आयतांचं पठन करत थेट त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. सोलिह यांनी विरोध करत हात धरण्याचा प्रयत्न केला. दोन-तीन वेळा प्रयत्न करुनही चाकू मानेवर लागला नाही. मात्र, मंत्र्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

Maldives
Giorgia Meloni: इटलीयन नेत्याने युक्रेनियन महिलेच्या बलात्काराचा व्हिडिओ केला शेअर

त्यानंतर, त्यांनी जीव वाचवून तिथून पळ काढला. त्यांनी स्कूटर तिथेच सोडली. हल्लेखोराला नंतर अटक करण्यात आली. सोलिह यांच्या पक्षाने डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ मालदीवशी युती केली आहे. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम (President Ibrahim) यांच्या सरकारमध्ये (Government) ते मंत्री आहेत.

राष्ट्रपतींवरही हल्ला झाला आहे

सोलिह यांच्यावर हुलहुमाले येथील रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. मे 2021 मध्ये मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांच्यावरही हल्ला झाला होता. त्यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्बस्फोट करण्यात आला होता. नशीद यांच्या कारजवळ बॉम्ब ठेवण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर नशीद यांना विमानाने जर्मनीला नेण्यात आले.

Maldives
Saudi Arabia ची अर्थव्यवस्था मोठ्या बदलाच्या वाटेवर, 'आता फक्त तेलच नाही तर...'

कट्टरतावादाचे आव्हान मालदीवसमोर आहे

मालदीवला सध्या इस्लामिक कट्टरतावादाचे आव्हान आहे. इथे दहशतवादी संघटना सक्रिय असून मोठ्या प्रमाणात भरतीही करत आहेत. अध्यक्ष सोलिह आणि स्पीकर नाशीद यांचे सरकार उदारमतवादी विचारांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर सरकारने अतिरेकाविरोधातही लढा पुकारला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com