जगभरातील ओमिक्रॉन बद्दल तज्ञ चिंतेत आहेत. अद्याप ओमिक्रॉन विरुद्ध लढण्यासाठी कोणतीही लस तयार झालेली नाही. अशातच अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्नाने दावा केला आहे की, त्यांनी बनवलेली बूस्टर लस कोरोनाच्या ओमिक्रॉन वरही उत्तम काम करते. कंपनीने दावा केला आहे की 50 मायक्रोग्रॅमचा बूस्टर डोस ऍन्टीबॉडीजची पातळी 37 पट वाढवतोय, तर 100 मायक्रोग्रॅमचा बूस्टर डोस घेतल्यास ते कोरोनाविरूद्ध ऍन्टीबॉडीजची पातळी 83 पट वाढविण्यास मदत करते.
बूस्टर डोस पूर्णपणे सुरक्षित
बातमीनुसार, मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टीफन बॅन्सेल यांनी सांगितले की, कोविड 19 विरुद्धच्या या बूस्टर डोसचे () परिणाम ओमिक्रॉन वेरिएंटच्या (Omicron variant) विरुद्ध लढण्यास मदत करतील. पूर्ण डोसपासून अँटीबॉडीच्या पातळीत 83 पट वाढ दिसून येते. मॉडर्नाने म्हटले आहे की, दुसऱ्या आणि तिसऱ्या अभ्यासातून मिळालेल्या डेटामध्ये असे आढळून आले की बूस्टर डोस पूर्णपणे सुरक्षित आहे. मानवी शरीर हा डोस स्वीकारण्यास पूर्णपणे सक्षम आहे. त्याचा दूसरा कोणताही इफेक्ट जाणवत नाही.
M-RNA वर आधारित मॉडर्ना ची लस
मॉडर्ना ची कोविड लस मेसेंजर RNA (mRNA) तंत्रज्ञानावर आधारित आहे. मॉडर्नाने ही लस यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या भागीदारीत विकसित केली आहे. मेसेंजर आरएनए तंत्रज्ञान कोविड (covid-19) विषाणूविरूद्ध पेशी सक्रिय करून रोगप्रतिकार शक्ती (Immunity) विकसित करते. मॉडर्नाची लस अनुवांशिक निर्देशांवर आधारित आहे. 'ओमिक्रॉन' आतापर्यंत सुमारे 90 देशांमध्ये पसरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.