"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

Terrorist Saifullah Kasuri: दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा दुसरा सर्वात महत्त्वाचा नेता सैफुल्लाह कसूरी याने पाकिस्तानी लष्कराशी असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांची जाहीर कबुली दिली.
Terrorist Saifullah Kasuri
Terrorist Saifullah KasuriDainik Gomantak
Published on
Updated on

India Pakistan Tension: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) चा दुसरा सर्वात महत्त्वाचा नेता सैफुल्लाह कसूरी याने पाकिस्तानी लष्कराशी असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांची जाहीर कबुली दिली. एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्याने हे वक्तव्य केले असून याचा व्हिडिओ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय गुप्तचर सूत्रांनी या व्हिडिओची सत्यता पडताळली असून भारताने पाकिस्तानला 'ऑपरेशन सिंदूर'च्या पुढील टप्प्याचा गंभीर इशारा दिला.

एका अज्ञात तारखेला चित्रित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये सैफुल्लाह कसूरी लाल फुग्यांनी सजलेल्या एका उंच मंचावर उभा असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा कार्यक्रम एका शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता, जिथे शाळेचा लोगो स्पष्टपणे दिसत आहे. कसूरी हा तोच दहशतवादी आहे, जो जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 26 पर्यटकांच्या अमानुष हत्येसाठी जबाबदार आहे.

या व्हिडिओमध्ये कसूरी म्हणतो, "पाकिस्तानाचे (Pakistan) सैन्य मला अंत्यसंस्काराच्या प्रार्थनेसाठी आमंत्रित करते. तुम्हाला माहिती आहे का की, भारत सुद्धा मला घाबरतो?" कसूरीची ही कबुली भारतासाठी नवीन नाही, कारण भारताने गेल्या अनेक दशकांपासून जागतिक स्तरावर पाकिस्तान कशा प्रकारे दहशतवादाला राज्य पुरस्कृत आश्रय देतो, हे पुराव्यानिशी मांडले आहे.

Terrorist Saifullah Kasuri
AI Misuse By Terrorists: जगासमोर मोठे संकट! दहशतवादी संघटना घेताहेत ‘एआय’ची मदत; सोशल मीडियावरून हल्ल्याची शक्यता

'ऑपरेशन सिंदूर' नंतर दहशतवादी कारवायांत वाढ

काही महिन्यांपूर्वी पहलगाममधील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' नावाचे एक अचूक दहशतवादविरोधी अभियान राबवले होते. या मोहिमेत दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले होते. गुप्तचर अहवालानुसार, या मोहिमेच्या सहा महिन्यांनंतर आता पाकिस्तान समर्थित लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) यांसारख्या संघटना पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्यांची नवीन लाट आणण्यासाठी एकत्र येत आहेत. सीमेपलीकडे दहशतवाद्यांची मोठी जमवाजमव सुरु असल्याचे संकेत भारतीय यंत्रणांना मिळाले आहेत.

Terrorist Saifullah Kasuri
Terrorists Attack in Pakistan: पाकिस्तानात मोठा दहशतवादी हल्ला; 'पॅरा मिलिट्री फोर्सेस'च्या मुख्यालयात घुसून गोळीबार, तीन सैनिक ठार Watch Video

भारताचा कडक इशारा

भारताने (India) या गुप्तचर माहितीला "गंभीर चेतावणी" मानले आहे. भारतीय लष्कराची उत्तर कमांड सध्या हाय अलर्टवर असून सीमाभागातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट संदेश दिला की, जर पाकिस्तानचा दहशतवादाचा उद्योग असाच सुरु राहिला, तर भारतीय सैन्याला 'ऑपरेशन सिंदूर'चा दुसरा आणि अधिक तीव्र टप्पा सुरु करावा लागेल. पाकिस्तानने शाळांसारख्या ठिकाणी दहशतवाद्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, हे तिथल्या भावी पिढीसाठी किती धोकादायक आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे. मात्र, भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com