चिलीमध्ये (Chile) डाव्या विचारसरणीच्या गॅब्रिएल बोरिश (Gabriel Borish) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 56 टक्के मते मिळवून उजव्या विचारसरणीचे नेते जोस अँटोनियो (Jose Antonio) यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. असमानता आणि गरिबीचा सामना करण्यासाठी तरुणांच्या नेतृत्वाखालील सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्यासाठी Grabiel Borish यांनी अनेक महिने काम केले. असमानता आणि गरिबी हे दशकांपूर्वी जनरल ऑगस्टो पिनोशेच्या (Augusto Pinochet) हुकूमशाहीने लादलेल्या मुक्त बाजार मॉडेलचे अस्वीकार्य कमजोर मुद्दे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, या मेहनतीचे फळ Grabiel यांना मिळाले असून रविवारी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 56 टक्के मते मिळवून एकतर्फी विजय नोंदवला. 2012 मध्ये मतदान अनिवार्य झाल्यापासून कोणत्याही नेत्याला मिळालेला हा सर्वात जास्त जनतेचा आशिर्वाद आहे. वयाच्या 35 व्या वर्षी ते चिलीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकणारे सर्वात तरुण नेते आहेत. समर्थकांच्या प्रचंड गर्दीत गॅब्रिएल मंचावर पोहोचले आणि तेथून त्यांनी हजारो तरुण समर्थकांना देशी 'मापुचे' भाषेत एक उत्साहवर्धक विजयी भाषण दिले.
ते म्हणाले, “आम्ही एक अशी पिढी आहोत जी सार्वजनिक जीवनात अग्रेसर भूमिका निभावत आहोत. आमच्या हक्कांचा आदर हक्क म्हणून केला जावा, वस्तू किंवा व्यवसाय म्हणून नाही. आम्हाला माहित आहे की, श्रीमंत आणि गरीबांसाठी न्याय चालूच राहील.... त्याच वेळी, आम्ही हे ही सुनिश्चित करु की चिलीच्या गरिबांना असमानतेची किंमत मोजावी लागणार नाही."
बोरिस चिलीच्या महिलांना प्रोत्साहन देतो
त्यांनी चिलीच्या (Chile) महिलांनाही प्रोत्साहन देत वचन दिले की, त्या आमच्या सरकारमध्ये एक प्रमुख भूमिका बजावतील, "समाजातील सर्व प्रकारच्या पितृसत्ताक विचारांना कायमस्वरुपी मागे ठेवण्यास मदत करतील." निकाल स्पष्ट झाल्यानंतर लगेचच, अँटोनियो यांनी आपला पराभव स्वीकारत गॅब्रिएल यांना बोलावून त्यांचे अभिनंदन केले. यानंतर ते स्वत: गॅब्रिएलच्या प्रचार कार्याशी संबंधित मुख्यालयात गेले आणि त्यांच्या विरोधकांचीही भेट घेतली. दरम्यान, निवर्तमान अध्यक्ष सेबॅस्टियन पिनयेरा यांनी गॅब्रिएलसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि सत्ता हस्तांतरणादरम्यान त्यांच्या सरकारच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.