एका धक्क्याने पालटले नशीब! अनलकी लॉटरीवर निघाले 75 कोटींचे बक्षीस

काही दिवसांनंतर, जेव्हा लाकेद्राने कारमध्ये ठेवलेले लॉटरीचे तिकीट स्क्रॅच केले तेव्हा तिला विश्वासच बसला नाही.
LaQuedra Edwards
LaQuedra Edwards Twitter
Published on
Updated on

कॅलिफोर्निया: अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियामध्ये गर्दीत धक्काबुक्की करणाऱ्या महिलेला 75 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस काउंटीमध्ये, लॅक्वेड्रा एडवर्ड्स नावाची एक महिला लॉटरीची (Lottery) तिकिटे खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटमध्ये गेली होती. ती रांगेत उभी होती. यादरम्यान एका व्यक्तीने मागून ढकलले. यामुळे तिला तिचा आवडता क्रमांक निवडता आला नाही. लॉटरी स्क्रॅच व्हेंडिंग मशीनमध्ये, तिचा हात $40 च्या तिकिटाच्या बटनावर दाबला गेला.

LaQuedra Edwards
परकीय कारस्थान सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन आणि घरी जाईन; शाहबाज शरीफ

मोठ्या खेदाने तिने जमिनीवर पडलेले तिचे लॉटरीचे तिकीट उचलले आणि त्या माणसाकडे एकटक ती पाहत राहिली. तो माणूस काही न बोलता शांतपणे निघून गेला. लॅक्वेड्राला खूप वाईट वाटले की धक्क्यामुळे तिने चुकीचा नंबर निवडला. पण याच राँग नंबरने तिचे नशीब चमकले. ती महिला 40 डॉलरची लॉटरी जिंकली.

LaQuedra Edwards
रशियाच्या मित्र देशाला ड्रॅगन देणार क्षेपणास्त्रे, काय आहे चीनची रणनिती?

मी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेन

लॉटरी जिंकल्यानंतर लॅकेड्रा म्हणाली 'एका झटक्याने माझे नशीब बदलले. आता मला त्या अज्ञात व्यक्तीचे आभार मानायचे आहेत. त्याच्यामुळेच आता मी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेन. मी माझे घर खरेदी करू शकेन आणि लोकांच्या भल्यासाठी एनजीओ सुरू करू शकेन.

अमेरिकेच्या एकूण 50 राज्यांपैकी 43 राज्यांमध्ये लॉटरी चालतात, 7 राज्यांमध्ये लॉटरी नाहीत. एखाद्याला लॉटरी लागण्याची शक्यता खूप कमी असते, तरीही बहुतेक अमेरिकन लॉटरीच्या मागे धावतात. आणि त्यात असे एखाद्याचे नशिब पालटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com