King Charles-III: ब्रिटनमध्ये महाराणी एलिझाबेथ II नंतर 'या' गोष्टींमध्ये होणार बदल

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर सध्या राणीचा फोटो असलेले ब्रिटनचे चलन पाउंड स्टर्लिंगच्या जागी राजाचा फोटो लावण्यात येणार आहे.
King Charles-III |
King Charles-III |Dainik Gomantak

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबरला विंडसर कॅसल येथे अंत्यसंस्कार पार पडले. ब्रिटनमधील एलिझाबेथ द्वितीयचा युग संपला आणि यासह राजा चार्ल्स-III च्या युगाची सुरुवात होईल. ब्रिटनच्या राजेशाही-सरकारी कामापासून ते सर्वसामान्यांच्या जीवनापर्यंत अनेक ठिकाणी राणी एलिझाबेथचे नाव आहे.

नवीन राजा आल्यानंतर त्यांची जागा ब्रिटनला घ्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया हळूहळू पूर्ण केली जाईल. राजा चार्ल्स तिसरा याच्या राज्याभिषेकाला अजून वेळ आहे. त्यांना ब्रिटनचा राजा घोषित (King Charles-III) करण्यात आले आहे. त्यामुळे आता राणीचे चिन्ह बदलले जात आहे. नवीन शासकासह कोणती चिन्हे बदलली जाणार आहेत हे जाणून घेउया.

पासपोर्ट मध्ये बदल

यूकेच्या पासपोर्टवर 'हर मॅजेस्टी' लिहिलेले असते. हे पासपोर्ट अवैध ठरणार नसले तरी ते वापरत राहतील, मात्र नव्याने जारी केलेल्या पासपोर्टच्या पहिल्या पानावर 'हिज मॅजेस्टी' असे लिहिलेले असेल.

King Charles-III |
Iran Hijab War| इराणमध्ये हिजाबचा वाद पेटला, 5 आंदोलकांचा मृत्यू

राष्ट्रगीतामध्ये बदल

ब्रिटनच्या राष्ट्रगीतामध्ये बदल होणार आहे. ज्यात सध्या ""God Save the Queen" असे बोलले जात होते. आता त्याला"God Save the King"असे म्हटले जाईल. बाकीचे शब्द तेच राहतील, पण जिथे Queen असेल तिथे King असेल.

गार्ड्सनाव आणि कपड्यांमध्ये बदल

क्वीन्स कंपनीचे हे ग्रेनेडियर गार्ड्स, ज्यांना पूर्वी राणीचे गार्ड म्हटले जायचे. यापुढे यांना किंग्ज गार्ड म्हटले जाईल. हे रक्षक गेली 70 वर्षे ब्रिटनच्या राणीच्या (Queen Elizabeth II) सेवेत होते. त्यांच्या कपड्यातही बदल होणार आहे. गणवेशावरील बटणे, ज्यात आतापर्यंत राणीचे शाही चिन्ह होते, ते राजा चार्ल्स द थर्ड यांच्या चिन्हासह बदलले जातील.

यूकेचे चलन मध्ये बदल

यूकेचे चलन, पाउंड स्टर्लिंग(Pound Sterling) ज्यावर सध्या राणीचा फोटो आहे. त्याच्या जागी राजाच्या फोटोचा समावेश केला जाईल. संपूर्ण यूकेमध्ये राणीच्या फोटोसह 4.7 अब्ज नोटा आहेत, ज्यांची किंमत £82 अब्ज किंवा सुमारे 7.45 लाख कोटी रुपये आहे. या सर्व नोटांमध्ये किंगचा फोटो टाकण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील. राणी एलिझाबेथ ही पहिली ब्रिटिश राणी होती जिचा फोटो चलनी नोटांवर छापण्यात आला होता.

नाणीही नवीन जारी केली जातील

राणी एलिझाबेथचा फोटो असलेली सुमारे 290 दशलक्ष नाणी वापरात आहेत. 1971 पर्यंत अनेक राजांची चित्रे असलेली नाणी चलनात होती. परंतु त्यानंतर ही नाणी राणी एलिझाबेथच्या फोटोसह अद्ययावत करण्यात आली. राजा चार्ल्सचा फोटो असलेले हे नाणे कसे असेल हे अद्याप माहित नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की सहसा नाण्यांचे फोटो बदलले जाते तेव्हा राजा किंवा राणीचा चेहरा मागील फोटोवरून दुसरीकडे वळवला जातो. नाण्यांच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेत सुमारे 4,787 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे.

टपाल तिकिटात बदल

राणीचा फोटो असलेल्या सुमारे 220 अब्ज स्टॅम्पच्या प्रती छापल्या गेल्या आहेत. राजाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीसह, स्टँपवर आता राजा चार्ल्सचा फोटो असेल. यासोबतच संपूर्ण ब्रिटनमधील पोस्ट बॉक्स देखील बदलण्यात येणार आहेत कारण 1 लाख 15 हजार पोस्ट बॉक्सवर राणी एलिझाबेथची मुकुट स्वाक्षरी आहे, ज्यावर EIIR लिहिलेले आहे. E म्हणजे एलिझाबेथ आणि R म्हणजे रेजिना किंवा राणी. स्कॉटलंड वगळता सर्व पोस्ट बॉक्सवर राजा चार्ल्सचे चिन्ह असेल.

पोलीस आणि सरकारी इमारतींमध्ये राजाचा फोटो लावण्यात येणार

इंग्लंड आणि वेल्स पोलिसांच्या हेल्मेट प्लेटवर ब्रिटनच्या राणीचा फोटो आहे, ज्यावर राजाचा फोटो असणार आहे. याशिवाय ज्या ठिकाणी राणीचा फोटो होता, जसे की सरकारी इमारती व इतर ठिकाणी राजाचा फोटो लावण्यात येणार आहे.

अजून काय बदल झालेत?

  •  मोनार्क वकिलांची एक परिषद नेमतो ज्याला क्वीन्स कॉन्सिल म्हणतात, ज्याला यापुढे किंग्स कॉन्सिल म्हटले जाईल.

  •  अनेक पदव्या म्हणजेच राजघराण्यातील पदव्याही बदलल्या जातील.

  •  किंग चार्ल्सची पत्नी कॅमिला पार्कर हिला आता क्वीन कॉन्सोर्ट म्हटले जाईल.

  •  ब्रिटनच्या खासदारांच्या शपथविधीत होणार बदल, ते राणीऐवजी राजाच्या नावाने शपथ घेतील.

  •  यूके मधील शेकडो ब्रँड खाद्यपदार्थ आणि मसाल्यांमध्ये राणी किंवा राजेशाहीशी संबंधित चिन्हे आहेत, जी बदलणे आवश्यक आहे. Heinz आणि Burberry सारखे प्रसिद्ध ब्रँड यापैकी एक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com