अल कायदाचा (Al Qaeda) दहशतवादी ओसामा बिना लादेनने (Osama bin Laden) त्याच्या मृत्यूपूर्वी एक पत्र लिहिले होते, जे आता सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा (President Barack Obama) आणि सीआयएचे माजी महासंचालक डेव्हिड पेट्रोस (David Petros) यांना ठार मारण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याने ओबामा प्रशासनात उपाध्यक्ष असलेल्या जो बायडन (Joe Biden) यांना सोडण्यास सांगितले. लादेन म्हणाला होता की, 'बायडन राष्ट्रपतीपदासाठी पूर्णपणे तयार नाहीत आणि ओबामा यांच्या हत्येनंतर ते अध्यक्ष झाले तर अमेरिका अडचणीत येईल.'
2010 मध्ये ओसामा बिन लादेनने लिहिलेले हे 45 पानांचे पत्र पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या कंपाऊंडमधून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट आहे. जिथे 2011 मध्ये अमेरिकन सैनिकांनी त्याला ठार मारले. लादेनने आपल्या टीममधील दोन टीमला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तैनात करण्यास सांगितले आणि "त्यांच्यापैकी एकाच्या विमानाला लक्ष्य करण्यासाठी" त्यांच्या भेटी दरम्यान पेट्रोस आणि ओबामा यांना ठार केले.
बायडन यांची टीका
हे पत्र प्रथम 2012 मध्ये प्रकाशित झाले. पण आता ते पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे कारण अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली अन् आणि तालिबान सत्तेवर आला. (Taliban Afghanistan News). आणि संपूर्ण जग बायडन यांच्यावर टीका करत आहे. त्याच्यांवर खूप टीका केली जात आहे की, त्यांनी कठीण काळात अफगाणिस्तानला मदत करण्याऐवजी एकटं सोडला आहे. बिन लादेनच्या म्हणण्यानुसार, "9/11 आणि त्यानंतर अफगाणिस्तानवरील अमेरिकेच्या हल्ल्यामुळे" मुस्लिमांमध्ये त्यांच्या सहकारी मुजाहिदीनबद्दल सहानुभूती निर्माण झाली."
तालिबानशी घनिष्ठ संबंध
तालिबान आणि अल कायदा हे एकमेकांच्या जवळचे मानले जातात. जेव्हा अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला, तेव्हा त्याचा दोष ओसामा बिन लादेनवर (Al Qaeda Relations With Taliban) देण्यात आला. तो अफगाणिस्तानात लपला असल्याची बातमी आली होती. त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि 2001 मध्ये तालिबानला सत्तेवरून उखडून टाकले. या वर्षी अध्यक्ष झाल्यानंतर बायडन यांनी या देशातून आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. तालिबानने एकदा अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हाही माघार पूर्ण झाली नव्हती. याला अमेरिकेचे अयशस्वी मिशन असेही म्हटले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.