''आम्ही येतोय...'', कॅनडातील खलिस्तान्यांची PM मोदींसह अमित शाह यांना धमकी

Sikhs for Justice: 10 सप्टेंबर रोजीच, खलिस्तान्यांनी व्हँकुव्हर येथील गुरुद्वारामध्ये भारताविरुद्ध जनमत संग्रहांचे आयोजन केले.
Gurpatwant Singh Pannu
Gurpatwant Singh PannuDainik Gomantak
Published on
Updated on

Sikhs for Justice: G-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खलिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता.

यावर ट्रुडो यांनी आपल्या देशातील फुटीरतावादी तत्वांना लगाम घालू असे आश्वासनही दिले होते. तथापि, कॅनडातील सक्रिय खलिस्तान्यांच्या कारवाया अजूनही कमी झालेल्या नाहीत.

10 सप्टेंबर रोजीच, खलिस्तान्यांनी व्हँकुव्हर येथील गुरुद्वारामध्ये भारतविरोधी जनमत संग्रहाचे आयोजन केले होते.

यातच आता, खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसचा नेता गुरपतवंत सिंग पन्नू याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याने भारताला कॅनडातील दूतावास बंद करण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

यावरुन असे दिसून येते की, भारताच्या कॅनडाबाबतच्या कठोरतेचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. पन्नू एका व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतोय की, 'हा संदेश त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी हरदीप सिंह निज्जरला मारले.

मोदी, जयशंकर, डोभाल आणि शाह, आम्ही तुमच्यासाठी येत आहोत.'' हरदीप सिंग निज्जर हा खलिस्तानी दहशतवादी (Terrorist) होता, जो या वर्षी जूनमध्ये कॅनडातील सरे येथे गोळीबारात मारला गेला.

Gurpatwant Singh Pannu
Canada: गँगस्टर अमरप्रीत समराची कॅनडामध्ये गोळ्या झाडून हत्या, लग्न समारंभात गोळीबार!

त्याच्या मृत्यूबाबत खलिस्तानी आरोप करत आहेत की, तो भारत सरकारच्या सांगण्यावरुन झाला आहे. कॅनडाच्या गुरुद्वारामध्ये जनमत संग्रहाच्या नावाखाली आयोजित कार्यक्रमात 5 ते 7 हजार लोक उपस्थित होते.

दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याकडे खलिस्तानच्या वाढत्या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत आणि चांगले राहण्यासाठी या लोकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी कॅनडातील भारतविरोधी तत्वांच्या कारवायांवर चिंता व्यक्त केली होती. ते भारतीय राजनयिकांना धमकावून भारतविरोधी कारवाया करतात.

याशिवाय, तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या लोकांनाही अनेकदा धमक्या दिल्या जातात. यावर पीएम मोदींनी कारवाई करण्यास सांगितले आहे.

Gurpatwant Singh Pannu
Canada New Rules: कॅनडामध्ये 'या' लोकांवर घरं खरेदी करण्यावर सरकारची बंदी

पीएम मोदींच्या आक्षेपाला ट्रुडोंनी काय उत्तर दिलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत जस्टिन ट्रूडो म्हणाले होते की, 'त्यांचा देश शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार कायम ठेवेल. मात्र, यानिमित्ताने द्वेष पसरवला जाणार नाही याचीही खबरदारी घेईल.' यापूर्वीही खलिस्तानी तत्वांमुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com