Dawood Ibrahim: मोठा खुलासा! कराची विमानतळ डी कंपनीच्या नियंत्रणाखाली; नातेवाईकांना थेट एन्ट्री...

Dawood D Company In Pakistan: टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करत एनआयएने देशाचा दुश्मन नंबर 1 दाऊद इब्राहिमबाबत मोठा खुलासा केला आहे.
Dawood Ibrahim
Dawood IbrahimDainik Gomantak
Published on
Updated on

Dawood D Company In Pakistan: टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करत एनआयएने देशाचा दुश्मन नंबर 1 दाऊद इब्राहिमबाबत मोठा खुलासा केला आहे. डी कंपनी सिंडिकेट आणि टेरर फंडिंगच्या तपासात गुंतलेल्या एनआयएने कराची विमानतळ डी कंपनीच्या ताब्यात असल्याचे चौकशीदरम्यान समोर आणले आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह त्याचे कुटुंबीय किंवा त्या दोघांना भेटण्यासाठी येणारे नातेवाईक आणि मित्र या विमानतळावर आले तर त्यांच्या पासपोर्टवर स्टॅम्प वगैरेची औपचारिकता पूर्ण होत नाही.

नातेवाईक आणि मित्रांना इमिग्रेशन काउंटरवर जाण्याची गरज नाही

एनआयएच्या (NIA) चौकशीत असे समोर आले आहे की, जेव्हा कोणी दाऊदला भेटायला येतो तेव्हा त्याला कराची विमानतळावरील व्हीआयपी लाउंजमधून रिसीव्ह केले जाते आणि थेट दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकीलच्या घरी पोहोचवले जाते. कराची विमानतळावरील (Karachi Airport) डी कंपनीचे वर्चस्व यावरुन लक्षात येते की, त्यांना भेटायला आलेले लोक जेव्हा परत जातात तेव्हा त्यांना पाकिस्तानच्या कनेक्टिंग फ्लाइटमध्ये इमिग्रेशन क्लिअरन्स आणि स्टॅम्पशिवाय थेट दुबई किंवा आखाती देशांमध्ये पाठवले जाते.

Dawood Ibrahim
Don Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने केले दुसरे लग्न, पाकिस्तानमधील राहते घरही बदलले

पाकिस्तान जगाला अशा प्रकारे फसवत आहे

अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान आपल्या भूमीवरुन सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांचा सुगावाही जगाला लागू देत नाही. कारण जगातील कोणत्याही एजन्सीला किंवा सरकारला दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) किंवा छोटा शकील किंवा पाकिस्तानात पोहोचलेल्या व्यक्तीला कोणी भेटल्याची कल्पना नाही.

Dawood Ibrahim
Dawood Ibrahim: एनआयकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर 25 लाखाच बक्षीस जाहीर

विशेष म्हणजे, छोटा शकीलचे नातेवाईक सलीम फ्रूट याला तपास यंत्रणेने नुकतीच अटक केली होती. यानंतर सलीम फ्रूट याची पत्नी साझिया मोहम्मद हिचा जबाब नोंदवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, साजिया आणि मुंबईत उपस्थित असलेल्या एका टूर आणि ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाच्या चौकशीत, पाकिस्तानचे हे विमानतळ अंडरवर्ल्डच्या ताब्यात असल्याची पुष्टी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com