Kapil Sharma: कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार, खलिस्तानी दहशतवाद्यांनी स्वीकारली जबाबदारी Video

Kapil Sharma Cafe Firing: कपिल शर्माला धमकी देण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Canada café shooting | Khalistani terrorist attack
Kapil SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Kapil Sharma Canada Cafe Firing

कॉमेडियन कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी येत आहे. २ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी कॅनडामध्ये सुरु केलेल्या रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला आहे. 'कॅप्स कॅफे' नावाच्या या रेस्टॉरंटवर गोळीबार करण्यात आला आहे. खलिस्तानी दहशतवाद्यांनी या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅफे उघडल्यानंतर काही दिवसांतच त्यावर गोळीबार झाला आहे. अज्ञातांनी अनेक गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्या. कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही.

Canada café shooting | Khalistani terrorist attack
Goa University: गोवा विद्यापीठात अश्लील 'फॅशन शो', विद्यार्थ्यांची अंडरवेअरमध्ये परेड; मानवाधिकार आयोगाची विद्यापीठाला नोटीस

या गोळीबाराची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने स्वीकारली आहे. लड्डी हा भारताचा एनआयएचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे आणि तो बीकेआय (बब्बर खालसा इंटरनॅशनल) शी संबंधित आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लड्डीने कपिल शर्माच्या काही जुन्या विधानामुळे हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. घटनास्थळी पोलिस आणि फॉरेन्सिक टीम उपस्थित आहे आणि तपास सुरू आहे.

कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नीच्या कॅनडामधील कॅफेला काही हल्लेखोरांनी लक्ष्य केले. या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच, कपिल किंवा गिन्नीकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. कपिल शर्माला धमकी देण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com