युकेत जंक फूडच्या जहिरातींवर बंदी येण्याची शक्यता!

britian.jpg
britian.jpg
Published on
Updated on

लंडन : जगभरात वाढत्या स्थूलपणाच्या समस्येवर युके सरकारने (UK government) महत्वाचं पाऊल उचललं आहे. स्थूलपणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जंक फूडपासून लहान मुलांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दूर ठेवण्यासाठी अशा पदार्थांच्या टीव्ही जहिरातींवर मर्यादा घालण्यासाठी बोरिस जॉन्सन सरकारने विचार केला आहे. त्यामुळे युकेत सॉप्ट ड्रिंग्स, केक्स, चॉकलेट, आईस्क्रिम, बिस्किट्स, प्लेवर्ड ज्यूस, चिप्स आणि पिझ्झांच्या जहिरातींवर रोख लावला आहे.  

बीबीसी माध्यमाच्या वृत्तानुसार, स्थूलपणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ज्या पदार्थांमध्ये मीठ, साखर आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते अशा पदार्थांवर युके सरकार बंदी आणण्याच्या विचारात आहे. त्यानुसार आता रात्री 9 पूर्वी अशा पदार्थांची जहिरात करता येणार नाही. तसेच अशा पदार्थांच्या ऑनलाईन प्रमोशनसाठी नियमावली सुध्दा तयार करण्यात आली आहे. जंक फूड कंपन्याना (junk food companies) त्यांच्या स्वत:च्या वेबसाईट्सवर देखील जंक फूडचे प्रमोशन करता येणार नाही त्यावर सुध्दा निर्बंध आणण्याचा विचार करण्यात येत आहे.  (Junk food ads likely to be banned in the UK) 

ब्रिटनच्या संसदेने (British Parliament) मागील वर्षी अशा प्रकारच्या जंक फूडच्या ऑनलाईन जहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र प्रदिर्घ चर्चेनंतर हा निर्णय पुन्हा मागे घेण्यात आला. दरम्यान, इंग्लंडमध्ये तब्बल एक तृतियांश नागरिकांमध्ये स्थूलपणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जॉन्सन सरकाररसाठी हा प्राधान्याचा मुद्दा बनला आहे. जॉन्सन सरकारने (Johnson government) यास कारणीभूत ठरणारे पर्याय शोधण्यास सुरु केल्यानंतर त्यांच्या समोर टीव्हीवरील जहिरातींवर निर्बंध घालण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार पुढील वर्षाच्या शेवटी नव्या नियमावलीची अमंलबजावणी होऊ शकते. यामध्ये आता जंक फूडच्या टिव्हीवरील जहिराती केवळ रात्री 9  ते सकाळी 5 वाजेपर्यंतच दाखवण्याची परवानगी असेल. जंक फूडबरोबर सेरल्स, रेडी मील, चिकन, नगेट्स, बॅटर्ड फीश, योगहर्ट्स यांचाही समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com