चीनच्या राज्य परिषदेने शुक्रवारी जॉन ली (John Lee) यांची हाँगकाँगचे पुढील मुख्य कार्यकारी (Chief Executive) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 8 मे रोजी झालेल्या निवडणुकीत ज्यामध्ये ली एकमेव उमेदवार होते. (John Lee appointed Hong Kong chief executive)
"राज्य परिषद, चीनच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत जॉन ली यांना हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्राचे (HKSAR) सहाव्या कालावधीसाठी मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला," असे शिन्हुआने वृत्त दिले आहे. ली हे 1 जुलै रोजी मुख्य कार्यकारी कॅरी लॅम यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.
गेल्या वर्षी, बीजिंगने हाँगकाँगच्या निवडणूक प्रणालीत सुधारणा केली. विशेष म्हणजे या सुधारणांमध्ये निर्दिष्ट केले की, केवळ "देशभक्त", म्हणजेच कम्युनिस्ट पक्षाशी निष्ठावान लोकच निवडणूक लढवू शकतात. या बदलांमुळे विधिमंडळातील निवडक जागांची संख्या कमी झाली, कोण पात्र ठरु शकेल यासंबंधीचे नियम कडक केले गेले. दुसरीकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निवडणाऱ्या समितीचे प्रतिनिधित्व बदलले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.