बायडेन दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर; लवकरच राष्ट्राध्यक्ष यून सोक-युल यांची भेट घेणार

जो बायडन यांचा राष्ट्रपती म्हणून हा पहिलाच आशिया दौरा आहे.
Joe Biden
Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) शुक्रवारी दक्षिण कोरियामध्ये (South Korea) दाखल झाले आहेत. बायडन यांचा राष्ट्रपती म्हणून हा पहिलाच आशिया दौरा आहे. सोलमध्ये त्यांचे आगमन झाल्यावर, दक्षिण कोरियाचे परराष्ट्र सचिव पार्क जिन आणि कोरियातील यूएस आर्मीचे कमांडिंग जनरल पॉल लाचेमेरा, इतर अमेरिकन आणि दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्वागत केले. (Joe Biden on tour of South Korea He will soon meet with President Eun Sok yul)

Joe Biden
भारतात ब्लॅकलिस्ट होतोय पाकिस्तानचा 'सोढा राजपूत', विवाह अन् व्हिसा कनेक्शन

शुक्रवारी दिवसाच्या उत्तरार्धात, पूर्व-निर्धारित वेळापत्रकानुसार बायडेन दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक-योल (Yoon Seok youl) यांची देखील भेट घेणार आहेत. बायडेन 24 मे रोजी जपानमध्ये होणार्‍या क्वाड समिट 2022 ला देखील उपस्थित राहतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांचे दक्षिण कोरियाचे समकक्ष युन सुक-योल परमानुवर चर्चा करणार आहेत, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले आहे. उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाला असलेल्या धोक्यावरही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

उत्तर कोरियाशी संबंध चांगले

बायडेन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यावेळी सांगितले की, अमेरिका कूटनीतीद्वारे उत्तर कोरियाशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न देखील करत आहे. आपणास सांगूया की सध्या उत्तर कोरिया गंभीर कोरोना महामारीतून जात आहे. उत्तर कोरियाकडे पुरेशा संसाधनांचा साठा नाही जेणेकरून किम जोंगचे (Kim Jong-un) सरकार उत्तर कोरियाच्या लोकांना आरोग्य सुरक्षा देऊ शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com