Japanese Woman marries Pakistani Man: खऱ्या प्रेमात रंग, जात, धर्म, वय या गोष्टी महत्त्वाच्या नसतात, असं म्हणतात. पाकिस्तानमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये जपानमधील एक महिला आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी देश सोडून पाकिस्तानात आली आहे. महिलेचे वय 50 वर्षे असून पाकिस्तानी तरुणाचे वय 32 वर्षे आहे. (Japanese woman converts to Islam in love with Pakistani Man)
फेसबुक (Facebook) या सोशल नेटवर्किंग साइटवर दोघे भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. हयासाका सायका असे या महिलेचे नाव असून तिला एक मुलगीही आहे. पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडल्यानंतर सायका पाकिस्तानात आली आणि तरुणाने वयाची पर्वा न करता तिच्याशी लग्नही केले. पाकिस्तानी तरुणाने महिलेच्या मुलीलाही दत्तक घेतले. लग्नाआधी महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्यानंतर दोघांनी लग्न केल्याचे सांगितले जात आहे. या विवाह सोहळ्याला काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
पाकिस्तानी (Pakistan) मीडियाच्या वृत्तानुसार, काही रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, महिलेचे हे चौथे लग्न आहे. गेल्या वर्षीही पाकिस्तानात असेच एक प्रकरण समोर आले होते. पोलंडमधील 83 वर्षीय महिलेचे पाकिस्तान पंजाबमधील हाफिजाबाद येथील एका 28 वर्षीय पुरुषाच्या प्रेमात पडले. यानंतर ती महिलाही तिच्या पाकिस्तानी प्रियकराला भेटण्यासाठी तिच्या घरी आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.