कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषध खाल्ल्याने जपानमध्ये 2 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक रुग्णालयात दाखल

Japan Cholesterol Tablets Spark Health Scare: कोलेस्टेरॉल कमी करणारे औषध खाल्ल्याने दोघांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Cholesterol Tablets
Cholesterol Tablets Dainik Gomantak

Japan Cholesterol Tablets Spark Health Scare: जपानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलेस्टेरॉल कमी करणारे औषध खाल्ल्याने दोघांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर औषध उत्पादक कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाल्यानंतर, औषध उत्पादक कंपनी कोबायाशी फार्मास्युटिकलने वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर, आम्ही बेनी कोजी चोलेस्टे हेल्प आणि इतर दोन पूरक औषधे बाजारातून काढून घेतली आहेत. या औषधांचा तपास सुरु आहे. या औषधांमध्ये बेनी कोजी नावाचा घटक ॲड केला जातो, जो हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी स्टॅटिनचा पर्याय म्हणून पाहिला जातो. पण त्यात केमिकल असल्याने अवयव खराब होण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जपानचे आरोग्य मंत्री नूनून म्हणाले की, कोबायाशी फार्मास्युटिकलने या प्रकरणी लवकरात लवकर अहवाल सादर करावा. याशिवाय, मंत्र्यांनी या औषधांमुळे होणाऱ्या हानीबाबत संपूर्ण देशात अलर्ट लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने (Government) बाधित लोकांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. मंत्री महोदय पुढे म्हणाले की, अधिकारी कंपनीशी बोलतील आणि या प्रकरणात आवश्यक ती पावले उचलतील. याशिवाय, या आठवड्यात हेल्थ इमरजन्सी लागू करण्यावर बैठक बोलावण्यात येणार आहे.

Cholesterol Tablets
Naked Man Festival in Japan: जपानच्या 'नेकेड मॅन' महोत्सवात आता महिलाही सहभागी होणार; 1,250 वर्षांत प्रथमच निर्णय

कंपनीचे शेअर्स पडले

दरम्यान, या घटनेमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. कोबायाशी फार्मास्युटिकलच्या शेअर्समध्ये (Shares) मोठी घसरण झाली आहे. काही अहवालांमध्ये मृतांची संख्या दोनपेक्षा जास्त असू शकते असा दावा करण्यात आला आहे. कालच चौकशी केल्यानंतर कंपनीने सांगितले होते की, मृत्यू झालेल्यांपैकी एक जण गेल्या तीन वर्षांपासून सतत औषध घेत होता. आम्ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि प्रभावित झालेल्या सर्वांची माफी मागतो, असे कंपनीने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com