'पत्रे, चप्पल अन् चष्मा...,' महात्मा गांधींशी संबंधित वस्तूंचा ब्रिटनमध्ये होणार लिलाव

ब्रिटनमध्ये महात्मा गांधींशी (Mahatma Gandhi) संबंधित वस्तूंचा लिलाव होणार आहे.
Mahatma Gandhi
Mahatma GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

ब्रिटनमध्ये महात्मा गांधींशी संबंधित वस्तूंचा लिलाव होणार आहे. या लिलावाद्वारे पाच कोटींहून अधिक रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. महात्मा गांधींच्या वस्तूंचा लिलाव होणार असून त्यात त्यांची लंगोटी, लाकडी चप्पल आणि त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो यांचा समावेश आहे. (Items related to Mahatma Gandhi will be auctioned in Britain)

डेली मिररच्या रिपोर्टनुसार, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याशी संबंधित एकूण 70 वस्तूंचा लिलाव होणार आहे. यातील काही गोष्टी महात्मा गांधींशी (Mahatma Gandhi) संबंधित आहेत, तर काही त्यांनी वापरलेल्या होत्या. त्यात तुरुंगात असताना लिहिलेल्या पत्रांचाही समावेश आहे.

Mahatma Gandhi
इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली एस जयशंकर यांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

दुसरीकडे, लिलावात सुमारे पाच कोटी रुपये सहज जमा होतील, असा विश्वास ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्सला आहे. या ऑक्शन हाउसने यापूर्वी 2020 मध्ये महात्मा गांधींच्या चष्म्याचा 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत लिलाव केला होता. "या वस्तू खरोखरच मी लिलावात पाहिलेल्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत," असे लिलावकर्ते अँड्र्यू स्टोव यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, हा संग्रह आपल्या जगाच्या इतिहासासाठी खूप महत्त्वाचा आहे.'' यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गांधींचा तो फोटो, जो त्यांच्या आयुष्यातील शेवटचा फोटो मानला जाता.

लिलाव होणार्‍या वस्तूंमध्ये गांधींचा फोटो सर्वात खास आहे

वास्तविक, तीन आठवड्यांनंतर जिथे महात्मा गांधींची हत्या झाली त्याच ठिकाणी हा फोटो काढण्यात आला होता. या फोटोत ते ज्या खुर्चीवर बसले आहेत, तीच खुर्ची आहे ज्यावर ते खुनाच्या दिवशी बसले होते. अँड्र्यू म्हणाले, 'ही एक अतिशय खास वस्तू आहे, ज्याचा एक लाख रुपयांपर्यंत सहजपणे लिलाव केला जाईल.' असे मानले जाते की हा त्यांचा शेवटचा ज्ञात फोटो असावा, जो त्यांनी शूट करण्यापूर्वी काढला होता.' हा न पाहिलेला फोटो आहे. जो 1947 मध्ये दिल्लीतील (Delhi) बिर्ला हाऊसमध्ये घेण्यात आला होता. यामध्ये ते खुर्चीवर बसलेले दिसून येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com