टीव्ही कार्यक्रमात लैंगिक टिप्पणी, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया यांनी जोडीदारासोबतचे 10 वर्षांचे संबध तोडले

Italy PM Giorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ब्रेकअप केले आहे.
Italy PM Giorgia Meloni
Italy PM Giorgia MeloniDainik Gomantak
Published on
Updated on

Italy PM Giorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी ब्रेकअप केले आहे. अँड्र्यू जियाम्ब्रुनोबरोबर 10 वर्षांपासून मेलोनी रिलेशिपमध्ये होत्या. मात्र आता ब्रेकअपविषयी खुद्द मेलोनी यांनी माहिती दिली.

अँड्र्यू जियाम्ब्रुनो एक टीव्ही पत्रकार आहेत. दोघांना एक मुलगीही आहे. मेलोनी यांच्या मते, या विभक्त होण्यामागचे कारण जियाम्ब्रुनोने टीव्ही कार्यक्रमादरम्यान केलेली लैंगिक टिप्पणी आहे. विशेष म्हणजे, या विवादादरम्यान मेलोनी भारतात G20 शिखर परिषदेत सहभागी झाल्या होत्या.

फेसबुकवर लिहिले

मेलोनी यांनी फेसबुकवर (Facebook) लिहिले की, माझे अँड्र्यू जिआम्ब्रुनोसोबतचे नाते सुमारे 10 वर्षे टिकले. आता ते संपुष्टात येत आहे. आमचे मार्ग आता वेगळे झाले आहेत आणि आता ते स्वीकारण्याची वेळ आली आहे.

Giambruno हा Mediaset द्वारे प्रसारित केलेल्या वृत्त कार्यक्रमाचा प्रस्तुतकर्ता आहे. हा MFE मीडिया ग्रुपचा एक भाग आहे, ज्याची मालकी दिवंगत सिल्व्हियो बर्लुस्कोनी, माजी पंतप्रधान आणि मेलोनी सहयोगी यांच्या वारसांच्या मालकीची आहे.

ग्रुप सेक्सबाबत टिप्पणी

या आठवड्यात दोन दिवस दुसर्‍या Mediaset शोने Giambruno च्या कार्यक्रमातील ऑफ-एअर काही भाग प्रसारित केला, ज्यामध्ये तो अपशब्द वापरत असून महिला सहकाऱ्याचा विनयभंग करताना दिसत आहे.

यामध्ये तो महिला (Women) सहकाऱ्याला म्हणतो, मी तुला आधी का भेटलो नाही? दुसरी क्लिप गुरुवारी प्रसारित झाली. यामध्ये जिआमब्रुनो नात्याबद्दल दावा करत आहे. तो त्याच्या महिला सहकाऱ्यांनाही सांगतो की, जर त्यांनी ग्रुप सेक्समध्ये भाग घेतला तर त्या त्याच्यासाठी काम करु शकतात.

यापूर्वीही टीका झाली आहे

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, Giambruno ने ऑगस्टमध्ये सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर पीडितेला दोषी ठरवल्याबद्दल टीका केली होती. तो आपल्या कार्यक्रमादरम्यान म्हणाला होता की, जर तुम्ही डान्स कराल तर तुम्हाला नशेत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे.

कोणत्याही प्रकारचा गैरसमज आणि कोणतीही अडचण नसावी. दरम्यान, मेलोनी यांनी या विवादावर टिप्पणी करताना सांगितले होते की, त्यांच्या जोडीदाराने केलेल्या टिप्पण्यांसाठी त्यांना जबाबदार धरु नये. तसेच, भविष्यात त्या त्याच्या वर्तनाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com