Italian Lawmaker Breastfeeding: इटलीच्या संसदेत बुधवारी (7 जून) ला पहिल्यांदाच एका बाळाला स्तनपान करण्यात आले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इटालियन महिला खासदार गिल्डा स्पोर्टिएलो यांनी आपल्या बाळाला फेडेरिकोला चेंबर ऑफ डेप्युटीजमध्ये स्तनपान केले.
यानंतर सर्व खासदारांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. यासोबतच त्यांचे खूप कौतुकही झाले.
अनेक देशांमध्ये स्तनपान करण्याची घटना समोर आल्या असून त्या सामान्य आहेत. पण इटलीसारख्या पुरुषप्रधान देशात कनिष्ठ सभागृहातील सदस्याने बाळाला स्तनपान देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
संसदीय अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ज्योर्जिओ म्हणाल्या की, सर्व पक्षांच्या पाठिंब्याने एखाद्याने बाळाला दूध पाजण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इटलीमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संसदीय नियमांच्या पॅनेलने महिला (Women) खासदारांना त्यांच्या मुलांसह संसदेच्या चेंबरमध्ये येण्याची आणि एक वर्षापर्यंतच्या बाळाला स्तनपान करण्यास परवानगी दिली होती.
इटलीच्या डाव्या विचारसरणीच्या फाइव्ह-स्टार मूव्हमेंट पार्टीशी संबंधित गिल्डा स्पोर्टिएलो यांनी सांगितले की, अनेक महिला वेळेपूर्वी स्तनपान थांबवतात.
महिला स्वतःच्या मनाने हे करत नाहीत, उलट त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यास भाग पाडले जाते तेव्हा त्यांना असे करावे लागते.
इटलीतील दोन तृतीयांश खासदार पुरुष
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, इटलीच्या इतिहासात प्रथमच, जॉर्जिया मेलोनी यांनी महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. इटलीतील दोन तृतीयांश खासदार पुरुष आहेत. पण बुधवारी घडलेली घटना इटलीमध्ये प्रथमच घडली आहे. याआधी तेरा वर्षांपूर्वी लिसिया रोन्झुली,ज्या आता सेंटर-राइट फोर्जा इटालिया पक्षाची सिनेटर आहे. त्यांनी स्ट्रासबर्ग येथील युरोपियन संसदेत आपल्या मुलीला स्तनपान केले होते.
स्तनपान करणे नवजात बाळासाठी असते महत्वाचे
वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीला स्थान आहे. आईच्या दुधाच्या रचनेला स्थान आहे. जेव्हा आपण मुलाला मूळ अन्न देऊ शकतो तेव्हा कृत्रिम का निवडावे. आईचे दूध हे ऍन्टीबॉडीज, जीवनसत्त्वे, प्रथिने, सूक्ष्म पोषक घटकांचे परिपूर्ण मिश्रण आहे आणि बाळासाठी निसर्गाने दिलेला आहार आहे. त्याच्या बरोबरीने त्याला पर्याय असू शकत नाही.
आईच्या दूधाचे बाळाला होणारे फायदे
नवजात बाळासाठी आरोग्याव्यतिरिक्त इतर अनेक कारणांसाठी आईचे दूध आवश्यक असते. मुलाच्या संज्ञानात्मक, मानसिक आणि शारीरिक विकासामध्ये आईच्या दुधाप्रमाणेच महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे प्रत्येक मुलाला किमान 6 महिने वयापर्यंत आईचे दूध मिळालेच पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.